लासलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवकास लाच घेताना रंगेहाथ पकडले

0
9

नाशिक – नुकतीच एक घटना घडली आहे लासलगावमध्ये. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवकास लाच घेतल्याप्रकरणी एसीबीने रंगेहाथ पकडले आहे.

याप्रकरणी तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, लासलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक बळीराम शेंडगे हा आपल्या पदाचा गैरवापर करून तक्रारदाराच्या पत्नीची संतती नियमन शस्त्रक्रिया निफाडमधील उपजिल्हा रुग्णालयात करून दिल्याच्या मोबदल्यात १००० रुपयांच्या लाचेची मागणी केली.

नंतर संबंधित तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवली व त्यानुसार पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्या आरोग्यसेवकास लाच स्वीकारताच रंगेहाथ पकडून अटक केली.

यावेळी संबंधित आरोग्यसेवकाने आपली चूक मान्य करत त्याने स्वत:च्या खर्चासाठी ही लाच स्वीकारल्याचे कबूल केले. दरम्यान, ह्याप्रकारणी लाच घेणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एसीबीचे अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप घुगे, साधना बेळगांवकर, हवालदार एकनाथ बाविस्कर, प्रफुल्ल माळी, विनोद पवार यांनी ही कारवाई केली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here