Skip to content

मुले पळवणारे समजून निरपराध फेरीवाल्यांना मारहाण


नाशिक – शहरातील उपनगर परिसरात मुले पळविणाऱ्यांची टोळी समजून काही नागरिकांनी दोघा निष्पाप फेरीवाल्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सोशल मीडियावर काही दिवसांपासून मुलांना पळवून नेणारी टोळी शहरात आली असल्याचा संदेश व्हायरल होतो आहे. याच व्हायरल संदेशावर विश्‍वास ठेवत उपनगर परिसरातील टाकळी भागात ब्लँकेट विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा निरपराध फेरीवाल्यांना मुले पळविणाऱ्यांची टोळी समजून परिसरातील काही नागरिकांनी बेदम मारहाण केली. ह्याप्रकरणी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल होताच वेळेवर हस्तक्षेप केल्याने दोघा फेरीवाल्यांची जमावाच्या तावडीतून सुटका केली.

यावेळी उपनगर पोलिसांनी दोघा फेरीवाल्यांना ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी केली. पण चौकशीअंती हे खरेच फेरीवाले असल्याचे व ह्या परिसरात नेहमी ब्लँकेट विकण्यासाठी येत असल्याचे सिद्ध झाल्यावर त्यांची सुटका केली. मात्र, या घटनेमुळे फेरीवाले भयभीत झाले आहे.

असे सांगण्यात येते की, परिसरातील एका लहान मुलाने सदर विक्रेत्याचे ब्लँकेट ओढल्याने त्याने त्याला हटकल्याचा प्रयत्न केला असल्याचे परिसरातील नागरिकांनी बघताच त्यातून ही घटना घडली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!