Skip to content

मुंबई महापालिकेत मनसे सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढणार


मुंबई – काही दिवसांपूर्वीच शिंदे गट व भाजप नेते राज ठाकरेंच्या भेटी घेत होत्या, त्यावरून नव्या युतीचे संकेत दिले जात होते. मात्र, पक्षाने आगामी निवडणुकासंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे ह्या सर्व चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

यासंदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मोठी घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी मनसे पक्ष कोणासोबत युती करणार नसून, अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही मुंबई महापालिकेतील सर्व २२७ जागा स्वबळावर लढणार आहोत. तसेच, येत्या काळात होणाऱ्या सर्व महानगरपालिका निवडणुकादेखील पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे.

मनसेचे सरचिटणीस असलेले संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही घोषणा केली आहे. तसेच, आम्ही स्वतंत्र असल्याचे सांगत त्यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना राज यांच्या आदेशानुसार आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही दिले.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अनेक नेत्यांनी मनसेसोबत युती करण्याचे सुतोवाच केले होते. मात्र, राज ठाकरेंनी वेदांत प्रकल्प व अनेक मुद्द्यावर शिंदे-भाजप सरकारवर आगपाखड केल्यावर ही युती संपल्याची चिन्हे दिसत होती. अखेर ह्या घोषणेमुळे संपूर्ण चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!