Kavita Raut : राज्यामध्ये एके बाजूस पेसा भरतीवरून आदिवासी समाज आक्रमक झाला असून दुसरीकडे सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळख असलेल्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी राज्य सरकारवरती “आदिवासी असल्याकारणाने माझ्या वरती अन्याय होत आहे.” असे आरोप माध्यमांशी बोलताना केले. ज्यामुळे आता राज्याचं वातावरण तापण्याची शक्यता आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी “मी आदिवासी असल्यामुळे माझ्यावर अन्याय होत असून राज्य सरकारच्या नोकरीसाठी दुजाभाव करत, मला डावले जात आहे. असे गंभीर आरोप राज्य सरकारवर केले. “आदिवासी असल्यामुळे मला शासकीय नोकरी पासून वंचित ठेवण्यात आले.
Mahayuti Sarkar | केंद्राची राज्य सरकारवर नाराजी; अजित पवारांनी मागितली भर सभेत माफी
Kavita Raut | ’10 वर्षे मंत्रालयाच्या फेऱ्या मारत आहे’
शासकीय धोरणांनुसार नोकरीसाठी मी अनेकदा अर्ज करूनही माझ्या अर्जांकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे. माझ्यापेक्षा कमी गुण आणि खेळात कमि श्रेणी असलेल्या खेळाडूंना सहज शासकीय नोकऱ्या देउ केल्या जातात. तेव्हा आदिवासी असल्यामुळे जातीला मध्यस्थी धरून तिने माझ्या शिकार केली जात आहे.” अशा शब्दात त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत त्यांनी सांगितले. “मी आदिवासी आहे. माझ्या पाठीशी कोणीही गॉडफादर नाही म्हणून गेल्या दहा वर्षांपासून राज्य सरकारी नोकरीत पासून वंचित ठेवले जात आहे. 2014 ते 2024 हि 10 वर्षे मंत्रालयाच्या फेऱ्या मारते आहे. मात्र माझे काम अजूनही होत नाहीये. राज्य सरकारी नोकरी देण्यासाठी दहा वर्षे का लागत आहेत? याचे उत्तर सरकारने द्यावे.” असा संतप्त सवाल अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत यांनी सरकारला केला आहे.
Jay Shah ICC Chairman | आयसीसीचे चेअरमन होणारे जय शाह पाचवे भारतीय; चेअरमन होताच होणार मालामाल..?
आदिवासी लोकप्रतिनिधींनी सरकारला धारेवर धरले
कविता राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर केलेल्या या आरोपांनंतर आता आदिवासी लोकप्रतिनिधींनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. याच प्रकरणावर भाष्य करत माकपचे माजी आमदार जेपी गावित आणि काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी “हे सरकार आदिवासी आणि बिगर आदिवासी असा भेदभाव करत असल्याचा” गंभीर आरोप यावेळी केला. नाशिक येथे आदिवासी विकास भवनासमोर मागील चार दिवसांपासून आदिवासी उमेदवारांचे पेसा पदाभरतीवरून आंदोलन सुरू होते. यावेळी कविता राऊत यांनी या आंदोलनाला भेट दिली. तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम