OBC Reservation | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधला आहे. ओबीसी आरक्षणाची अजूनही गरज असून सामान्य ओबीसीच्या हितासाठी ओबीसी नेत्यांनी समोर यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विदर्भ ओबीसी चळवळीत कुठेही मागे पडणार नाही. असं म्हणत, या निवडणुकीत कोणते 50 उमेदवार पाडायचे हे आमचे ठरले आहे. उमेदवारांची यादीही तयार आहे. असं म्हणत एक प्रकारे सरकारला इशारा दिला आहे.
OBC Reservation | तुम्ही एक भुजबळ पाडा, आम्ही १६० मराठे पाडू; ओबीसी नेत्यांचा एल्गार
काय म्हणाले लक्ष्मण हाके
“हैदराबाद गॅझेट असो किंवा इतर बाबी पण ओबीसी आरक्षण मुख्यमंत्री घालवतील. त्यामुळे विदर्भातील ओबीसी नेत्यांना विनंती आहे. सामान्य ओबीसींच्या हितासाठी ओबीसी आरक्षणाची गरज असून त्यासाठी ओबीसी नेत्यांनी समोर यावे. विदर्भ ओबीसी चळवळीत कुठेही मागे पडणार नाही. मी ओबीसीचा आवाज बनण्याचा प्रयत्न करीत आहे. ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करतोय.” असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
उमेदवारांची नावे घेत दिला इशारा
तर, कोणते 50 उमेदवार पाडायचे, हे आमचे ठरले आहे. त्या 50 उमेदवारांची यादी देखील तयार आहे. ज्यांनी जरांगेंना मदत केली, रसत पुरवली त्यांना आम्ही पाडणार. रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासारख्या उमेदवारांना आम्ही पाडणार. ओबीसीची भूमिका घेणारे अनेक तरुण विधानसभेत आहेत. त्यासाठी लक्ष्मण हाके रस्त्यावरची लढाई लढेल. असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर, “स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण गेले आहे. त्याबाबत कोर्टात प्रकरण सुरू आहे. आरक्षण म्हणजे पुढच्या पिढीचे भले होणार असे नाही, प्रत्येक घरात कलेक्टर होणार असे नाही आणि आरक्षण रेशनचे दुकानही नाही. तेव्हा आरक्षणाची पॉलिसी समजून घ्यावी.” असे देखील ते म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम