Deola | विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचा अपघात

0
16
#image_title

सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गवरील भावडबारी घाट परिसरात जिओ पंपा समोर बुधवार दि. २ रोजी सकाळी ११ वाजता एसटी बसचा अपघात झाला आहे, यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. याठिकाणी रस्त्यांचे काम रखडले आहे. यामुळे वारंवार छोटे-मोठे अपघात घडत असल्याने नागरिकांनी लोकप्रतिनिधींसह प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Deola | चांदवड महारोजगार मेळावा; एक हजार ३५८ उमेदवारांना मिळाली नोकरीची संधी

देवळ्याच्या दिशेने येणाऱ्या बसचा अपघात

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज बुधवार दि. २ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नाशिक देवळा या विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गवरील भावड बारी घाट परिसरातील जिओ पेट्रोल पंप नजीक, सटाणा आगाराची बस (क्र. एम. एच २० बी एल ३९१६) देवळ्याच्या दिशेने येत असताना तिला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने कट मारला यावेळी. बस चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या साईड पट्ट्यावर आणून उभी केली.

Deola | देवळा पब्लिक स्कूलच्या बाॅलबॅडमिंटन संघाची विभागीय स्तरावर निवड

बऱ्याच दिवसांपासून काँक्रिटीकरणाचे काम रखडलेले

बस प्रवाशांची खच्चून भरली होती. दैव बलवत्तर म्हणून यातील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम रखडले असून, वाहन धारकांना एकरी मार्गावरून मार्गक्रमण करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याठिकाणी सद्या नेहमीच अपघात घडत आहेत. या घटना टाळण्यासाठी व प्रवास सुखकर होण्याकामी रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रखडलेल्या कामामुळे वाहनधारक व ग्रामस्थांनी स्थानीक लोकप्रतिनिधी व प्रशासनावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here