Maratha OBC Reservation | मराठा-ओबीसी आरक्षण बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार; सभागृहांत गोंधळ, परिषद तहकूब

0
22
Vidhan Parishad Election
Vidhan Parishad Election

Maratha OBC Reservation | सरकारने आज मराठा-ओबीसी आरक्षण प्रश्नाबाबत चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, या बैठकीवर महाविकास आघाडीच्या पक्षांनी आणि नेत्यांनी बहिष्कार टाकला. दरम्यान, यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून चांगलीच जुंपली असून, देवेंद्र फडणवीस यांनी “मला वाटलं होतं की निदान शरद पवार तरी बैठकीला उपस्थित राहतील. परंतु महाराष्ट्र पेटत राहावा व त्यावर त्यांची राजकीय पोळी भाजत राहावी अशीच विरोधी पक्षाची भूमिका असल्याची टिका केली आहे.

दरम्यान, यावर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण देत सरकारला प्रत्युत्तर दिले आहे. हे तीन तोंडाचे सरकार असून, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. आरक्षणाबाबत सत्ताधारी राजकारण करत असल्याचे अंबादास दानवे म्हणाले. (Maratha OBC Reservation)

Maratha OBC Reservation | यावर सभागृहात चर्चा व्हायला हवी

मराठा-ओबीसी आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारकडून आपलाच अजेंडा राबवला जातो. आता सभागृह सुरू असून, सभागृहात यावर चर्चा व्हायला हवी. मात्र, हे विरोधकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आरक्षणाबाबत बैठक घेत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री मराठा समाजाला बोलतात आणि उपमुख्यमंत्री ओबीसी समाजाला बोलतात. हे सर्व गुपचूप काय बोलतात? हे आम्हाला कळू द्या. तुम्ही काय निर्णय घेताय ते आम्हालाही कळायला हवे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये मराठा-ओबीसी आरक्षणाबाबत जी भूमिका मांडली तीच आमची भूमिका असल्याचेही यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. (Maratha OBC Reservation)

Sakal Maratha Samaj | शरद पवारांनी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करावे अन्यथा..; मराठा समाजाचा पवारांना इशारा

विधानपरिषदेत गोंधळ; कामकाज तहकूब 

ओबीसी मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित सर्वपक्षीय बैठकीस उपस्थित न राहिल्याने सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर जोरदार टिका केली आणि गोंधळ घातला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात मार्शल्सन पाचारण केले आणि सदस्यांना एकमेकांपासून एक फूट अंतरावर उभे राहण्याचे निर्देश केले. उपसभापतींनी सभागृहात मार्शल्सना पाचारण केले. मात्र, तरीही यानंतरही सत्ताधारी आणि विरोधकांचा गोंधळ सुरुच होता. याच गोंधळात नीलम गोऱ्हे यांनी पुरवण्या मागण्या मंजूर करत कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही गटांनी सभागृह डोक्यावर घेतले. एकूणच परिस्थिती आणि गोंधळ पाहता नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषद सभागृहाचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब केले.(Maratha OBC Reservation)

Maratha Reservation | सरकारला नवा अल्टीमेटम; मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित

बैठकीला कोणते उपस्थित राहिले..? 

मराठा ओबीसी आरक्षणाबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी महाविकास आघाडीचे नेते या बैठकीला उपस्थित नव्हते. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, मंत्री छगन भुजबळ, रवींद्र चव्हाण, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री दादा भुसे, मंत्री अतुल सावे, मंत्री धनंजय मुंडे, खा. अशोक चव्हाण, खा. सुनील तटकरे, प्रकाश आंबेडकर, आमदार प्रवीण दरेकर, आ. गोपीचंद पडळकर, आ. बच्चू कडू, भरत गोगावले, महादेव जानकर आदी नेते उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here