Skip to content

PVR-INOX Subscription News| आता फक्त ७० रुपयांत बघा कोणताही चित्रपट…


PVR-INOX Subscription News:  १३ ऑक्टोबरला “राष्ट्रीय सिनेमा दिन” साजरा झाल्यानंतर आता पुन्हा एकदा कमी पैशांत रसिकांना चित्रपट बघण्याची संधी मिळणार आहे. पीव्हीआर आणि आयनॉक्स हे थिएटर्स सिनेरसिकांच्या भेटीला लवकरच एक नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन आणण्याच्या तयारीत आहेत. अधिकाधिक प्रेक्षकांनी चित्रपट बघावे, यासाठी ही स्किम जाहीर केलेली आहे. मनी कंट्रोलने यांनी दिलेल्या एका वृत्तानुसार, पीव्हीआर आणि आयनॉक्स ह्या थिएटर्समध्ये प्रेक्षकांना एका महिन्यात दहा चित्रपट तेही फक्त ६९९ रुपयांत बघता येणार आहे. या स्कीमनुसार सोमवार ते गुरुवार या वारांत ७० रुपयांचे तिकिट प्रेक्षक खरेदी करु शकणार आहे. या प्लॅन अंतर्गत एका महिन्यात युजर १० चित्रपटांचा आनंद लुटू शकणार आहेत.

Samsung च्या फोनवर 6800 रुपयांचा थेट डिस्काउंट; जाणुन घ्या कसा?

 

पण सिनेरसिकांना ह्या ऑफरचा लाभ विकेंडला म्हणजेच शुक्रवार ते रविवार या दिवसात घेता येणार नाहीये. तसेच या ऑफरमध्ये, प्रेक्षकांना एका दिवसात एकच तिकिट काढता येणार आहे. यावेळी प्रेक्षकांना आपल्या सोबत सरकारी ओळखपत्र देखील सोबत ठेवावं लागणार आहे.  कोरोना महामारीनंतर रसिकांचा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघण्याचा कल कमी झाला होता. यामुळे पीव्हीआर आणि आयनॉक्स या थिएटरच्या मालकांनी रसिकांची संख्या वाढावी यासाठी ही अनोखी शक्कल वापरण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!