तंत्रज्ञानाच्या युगात चांगला माणूस घडविण्यासाठी शिक्षकांची खरी गरज : डॉ. पुलकुंडवार

0
1

नाशिक – आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात चांगला माणूस घडविण्यासाठी शिक्षकांची खरी गरज आहे. त्यासाठीच शिक्षकांनी आज आर्य चाणक्य निर्माण होण्याची गरज आहे व शिक्षकांमध्ये समाजपरिवर्तन करण्याची प्रचंड क्षमता आहे, असे मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रतिपादित केले.

मनपाच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित सन २०२२-२३ मधील उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण काल महाकवी कालिदास कलामंदिरात पार पडला. यावेळी मनपा आयुक्त बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी, मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आदि उपस्थित होते. दरम्यान, सोहळ्यात मनपाच्या शाळांतील ६ तर खासगी शाळांतील ४ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

ते पुढे म्हणाले, सध्याच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या काळात माणूसपण हरवू नये असे संस्कार विद्यार्थ्यांना देणे गरज आहे. कारण, समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तसेच, प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्याला आपल्या मुलासारखे मानून त्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करावेत. कारण समाजात बदल घडवण्याचे कार्य हे केवळ शिक्षकच करू शकतात, म्हणून शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे.

यावेळी शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी म्हणाले, विद्यार्थ्यांमधील कौशल्याचा विकास करण्यासाठी नवीन शिक्षण धोरण उपयुक्त आहे, कारण त्यातून ते स्वतःला आत्मसात करतील. म्हणून शिक्षकांनी या धोरणाचा विरोध न करता तिचा स्वीकार करावा. तसेच, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांना सर्व अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी मांडले.

शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी-कर्मचारी, समग्र शिक्षा अभियानाचे सर्व कर्मचारी व आदींनी हा वितरण सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here