Skip to content

देवळा – कळवण रोड वरील सम्राट कंट्री लिकर दुकान चोरट्यांनी फोडले


देवळा ; येथील देवळा – कळवण रोड वरील सम्राट कंट्री लिकर (सरकार मान्य देशी दारू दुकानाचे ) अज्ञात चोरट्यानी मंगळवारी (दि२३) रोजी रात्री १२ वाजता शटर तोडून चोरी केली . चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या घटनेची खळबळ उडाली असून,देवळा पोलिसांत दुकानाचे संचालक हरीचन्द्र दीनानाथ कानडे यांनी तक्रार दाखल केली असून,पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे .

शटर तोडून चोरी व नुकसान झालेले देवळा – कळवण रोड वरील सम्राट कंट्री लिकर दुकान (छाया – सोमनाथ जगताप )

याबाबत अधिक माहिती अशी की , देवळा – कळवण रोडवर सम्राट कंट्री लिकर (सरकार मान्य देशी दारू दुकान ) आहे . हे दुकान नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि१३) रोजी रात्री साडे नऊ वाजता बंद झाले होते . व रात्री १२ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी दुकानाच्या कंपाऊंड वरून आत प्रवेश केला. व दुकानाचे शटर तोडून त्यातील शिल्लक रकमेचा पोबारा केला . दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ,हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला आहे . तसेच चोरट्यानी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर तोडण्याचा देखील प्रकार केला आहे .

यात दुकानाचे नुकसान झाले आहे .सकाळी नेहमीप्रमाणे संचालक हरीचंद्र कानडे दुकान उघडण्यासाठी गेल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला . कानडे यांनी लागलीच देवळा पोलीसात दुकानात चोरी झाल्याची तक्रार दाखल केली . यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्यारोधात गुन्हा दाखल केला आहे .

अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. दरम्यान देवळा शहरात भुरट्या चोरींचे प्रमाण वाढले असून, मोटरसायकल ,मोबाईल चोरीच्या घटना वारंवार घडत असून, नागरिक भयभीत झाले आहेत .या चोरट्यांचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!