
देवळा : देवळा बाजार समितीच्या नवीन मार्केट यार्डात शेतमाल लिलावासाठी शेड उभारण्यात येणार असून , या शेडचा उपयोग पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या शेतमालासाठी होईल तसेच नियोजित निंबोळा उपबाजार सुरू करणेसाठी बाजार समिती प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन बाजार समितीचे सभापती केदा आहेर यांनी केले.

देवळा बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार (दि.१२) रोजी सभापती केदा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी झालेल्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक सचिव माणिक निकम यांनी केले. मागील इतिवृत्त तसेच लेखापरीक्षण यांचे वाचन झाल्यानंतर बाजार समिती व शेतकरी यांच्या सोयीच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली. कृष्णा जाधव यांनी शेतकऱ्यांची पावसाळ्यात सोय व्हावी म्हणून लिलावासाठी शेड व्हावे अशी मागणी केली तर दीपक पवार यांनी मार्केट यार्डात खड्डे पडलेल्या ठिकाणी मुरूम टाकण्यात असे सांगितले. तसेच यावेळी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील निंबोळा येथे उपबाजार आवार सुरू करण्याच्या विषयावर आपण प्रस्ताव पाठवला आहे त्यामुळे तशी मंजुरी मिळाली की लवकरच सदर उपबाजार सुरू केला जाईल ,असे सभापती केदा आहेर यांनी सांगितले.
सध्या कांद्याचे बाजारभाव घसरले असल्याने शेतकरी वर्गाला दिलासा म्हणून प्रति क्विंटल किमान २०० रु. तरी अनुदान मिळावे अशी बाजार समितीने शासनाकडे मागणी करावी तसेच बाजार समितीने कांदा बियाणे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात उपलब्द करून द्यावे असे ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
दरम्यान सभेच्या सुरुवातीला बाजार समितीचे विद्यमान संचालक व माजी सभापती अशोक आहेर, आमदार विनायक मेटे, भऊर येथील जवान अविनाश पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत देवळा बाजार समितीने राज्यात ४५ वा, विभागात १७ वा तर जिल्ह्यात नववा क्रमांक मिळवल्याने आनंद व्यक्त करण्यात आला. सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
सभेप्रसंगी उपसभापती शंकर निकम, योगेश आहेर, रमेश मेतकर, बापू देवरे, चंद्रकांत आहेर, प्रदीप आहेर, दादाजी आहिरे, दादाजी पवार, जगदीश पवार, किशोर चव्हाण, संजय शिंदे, देवळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, सरपंच दीपक पवार, नानाजी सूर्यवंशी, व्यापारी प्रतिनिधी धनंजय देवरे, रमेश ठुबे, अमोल आहेर, डी के गुंजाळ, दीपक गोसावी, दादाजी देवरे, भाऊसाहेब देवरे, पोपट भामरे, धनाजी सोनवणे, अशोक सोनवणे, संगीता सोनवणे, हेमलता खैरणार यांच्यासह ग्रामपंचायत व सोसायटीचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम