Skip to content

नाशिक मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सोशल मिडिया अकाऊंट हॅक


नाशिक – महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांचे सोशल मिडिया अकाऊंट हॅक झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी त्यांनी सायबर पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

अधिक माहिती अशी आहे, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नागरगोजे यांचे सोशल मिडिया अकाऊंट हॅक झाले असून यामध्ये त्यांचे फेसबुक व इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची माहिती त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे दिली आहे.

याबाबत डॉ. नागरगोजे यांनी सर्वाना आवाहन केले की, कोणीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून माझ्या अकाऊंटवरून पैशांची मागणी केल्यास त्याला प्रतिसाद देऊ नका. याबाबतची तक्रार मी सायबर पोलिसांकडे केली असल्याचे माहितीदेखील त्यांनी दिली आहे.

यापूर्वीही महापालिकेतील अनेक अधिकाऱ्यांचे सोशल मिडिया अकाऊंट हॅक झाल्याची घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर महापालिकेचे फेसबुक अकाऊंटदेखील अज्ञातांनी हॅक केले होते, मात्र काही तासातच अधिकाऱ्यांनी पुन्हा फेसबुक अकाऊंटवर ताबा मिळवला होता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!