Skip to content

अल्फ इंजिनियरिंग कंपनीसमोर छावा युनियनचे आमरण उपोषण


नाशिक – अंबड एमआयडीसी येथील अल्फ इंजिनियरिंग कंपनीसमोर असेलेले अतिक्रमण काढून टाकावे तसेच कंपनीकडून कामगारांवर होत असलेला अन्याय व इतर मागणीसाठी छावा क्रांती संघटनेच्या कामगार युनियनने आमरण उपोषण सुरू केले आहे.

अंबड येथील अल्फ इंजिनियरिंग कंपनीच्या जागेवर काही लोकांनी बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे. ह्या अतिक्रमणामुळे कामगारांच्या जीवाला धोका असून कंपनी व्यवस्थापनाने याची त्वरित पाहणी करून हे अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी केली आहे. तसेच, कंपनीत काम करत असलेल्या कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेबद्दल कंपनी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप युनियनने केला आहे.

त्यासोबत कामगारांना मिळणारा पी.एफ. व अन्य बाबीबद्दलचे कायदेशीर नियमांचे पालन सदर कंपनीकडून केले जात नाही. कोणतेही कारण न देता ह्या कामगाराना बेकायदेशीररीत्या कंपनीतून काढून टाकण्यात आले. त्यामुळे १२ सप्टेंबरपासून हे आंदोलक उपोषणास बसलेले आहेत व यामुळे या आंदोलकांची तब्येत खालावण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शासनाने सर्व मागण्यांचा विचार करून संबंधित कंपनीवर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी छावा माथाडी व जनरल कामगार युनियनतर्फे अध्यक्ष विलास पांगारकर, मयुर पांगारकर, जिल्हाध्यक्ष कुलदीप मुसळे आणि इतर आंदोलकांनी केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!