नाशिक – जनतेची कामे कालमर्यादेत होण्यासाठी येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर ह्या काळात सर्व शासकीय विभागात सेवा पंधरवडा राबविणार असल्याचे जिल्हाधिकारी गंगाधरन डी. यांनी सांगितले आहे.
या पंधरवड्यानिमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते. तसेच त्यांनी ह्या कालावधीत सर्व विभागातील लोकसेवा हक्क सेवांविषयी प्रलंबित कामांचा वेळेवर निपटारा करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, ह्या सेवा पंधरवडा कालावधीत सर्वसामान्य जनतेशी निगडीत असलेले महसूल, ग्रामविकास, नगरविकास, कृषी, आदिवासी विकास, सार्व. आरोग्य विभाग व इतर सर्व शासकीय विभागांकडील लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांविषयीच्या प्रलंबित कामांचा निपटारा करून १० ऑक्टोबरपर्यंत तसा अहवाल सदर करण्याचा सूचना दिल्या आहेत.
सदर बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, महापालिका उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांसह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी आदी ऑनलाईन व ऑफलाईन उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम