अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन 

0
2

ठाणे : चार वर्षांसाठी सैन्यात भरती करून नंतर तरूणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या अग्निपथ या योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक आक्रमक झाली आहे. ठाणे शहरात गृहनिर्माण मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार रास्ता रोको (Nationalist Youth Congress) आंदोलन करण्यात आले.

सुमारे अर्धा तास हाय वेवर रास्ता रोको करण्यात आल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. केंद्र सरकारने नियमित सैन्य भरती बंद करून अग्निपथ ही योजना आणली आहे. या योजनेनुसार सैन्यात भरती होणाऱ्या तरूणांना चार (Nationalist Youth Congress) वर्षांनंतर निवृत्त करण्यात येणार आहे. यामुळे बेरोजगारांची संख्या वाढीस लागणार आहे.

हे सुद्धा वाचा : 

खर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शालेय साहित्य वाटप

या तरूणांना भाजपच्या कार्यालयावर सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात येणार असल्याचे भाजपचे नेते म्हणत आहेत, या सर्वांचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी (Nationalist Youth Congress) पाचपाखाडी येथे मुंबईच्या दिशेने जाणारा पूर्वद्रूतगती महामार्ग अडवला.

अचानक केलेल्या या आंदोलनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे अर्धा तासानंतर नौपाडा पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतली.यावेळी पोलीस आणि(Nationalist Youth Congress) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.

या वेळी शहराध्यक्ष विक्रम खामकर यांनी सांगितले की, सैनिकांना वन रँक वन पेंशन देतो म्हणत सत्तेत आलेल्या मोदी सरकारचा प्रवास आता “नो रँक नो पेंशन”, पर्यंत येवून थांबला आहे.अग्नीवीरच्या नावाखाली जो (Nationalist Youth Congress) खेळ मोदी सरकारने सुरू केलाय तो येणाऱ्या काळात आपल्या देशाला अत्यंत भयानक स्थिती कडे नेऊ शकतो.

देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here