Nathuram Godse | नथुराम गोडसेंच्या ‘अस्थी’ दर्शनासाठी नाशिककरांची खास यात्रा

0
59
Nathuram Godse
Nathuram Godse

Nathuram Godse |  २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह संपूर्ण देशभरात भक्तिमय वतावरून पसरले आहे. या प्रसंगी नाशिकमध्ये ‘मंगल अक्षता कलश’ हा दाखल झालेला असून, संपूर्ण जिलहाभरातून ही मंगल अक्षता कलश यात्रा काढण्यात येत आहे. काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे नाशिकच्या काही महाविद्यालयांमध्ये तर आज ही यात्रा वणी येथे सप्तशृंग गडावर दाखल झालेली आहे.

मात्र, यानंतर आता नाशिकमधून आणखी एका यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि ती म्हणजे महात्मा गांधी यांच्या हत्येतील दोषी असलेले नथुराम गोडसे यांच्या पुणे येथील अस्थि कलशाच्या दर्शनासाठीची यात्रा. दरम्यान, ही यात्रा नाशिकमधून २० जानेवारी रोजी काढली जाणार आहे. या उपक्रमामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्याचे चित्र आहे.(Nathuram Godse)

Ration | १ जानेवारी पासून सर्व रेशन दुकान बंद..!

दरम्यान, नाशिक येथील काही समविचारी लोकांनी एकत्र येत हा आगळा वेगळा उपक्रम आयोजित केलेला आहे.  आणि यासाठी त्यांनी नोंदणी प्रक्रिया देखील सुरू केलेली आहे. येत्या २० जानेवारी रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यान नाशिकमधून ही बस निघणार आहे. त्यानंतर ते भीमाशंकर येथे ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन ही मंडळी पुढे पुणे येथील जंगली महाराज रोड परिसरात असलेल्या गोपाळ गोडसे आणि नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांच्या घरी जाऊन त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेणार आहेत.

Nathuram Godse | अखंड हिंदूराष्ट्र हे नथुराम गोडसेंचे स्वप्न

भारत देश हा ‘अखंड हिंदूराष्ट्र’ व्हावा हे नथुराम गोडसे यांचे स्वप्न होते. सिंधू नदी ही भारतात आल्यानंतरच आपल्या अस्थींचे विसर्जन केले जावे, ही नथुराम गोडसे यांची इच्छा होती आणि याचमुळे अजूनही त्यांच्या अस्थींचे जतन करून ठेवण्यात आलेले आहेत. आता नथुराम गोडसेंचे बंधू गोपाळ गोडसे यांचे नातू अजिंक्य गोडसे यांच्याकडे त्या अस्थी आहेत. दरम्यान, नाशिकचे काही नागरिक हे त्या अस्थी कलशाचे दर्शन घेणार आहेत. विशेष म्हणजे नाशिककरांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला अभिनेते शरद पोंक्षेदेखील उपस्थित असणार आहेत.(Nathuram Godse)

Chandwad | चांदवड येथे लाचखोर सरपंच, उपसरपंच एसीबीच्या जाळ्यात

या यात्रेच्या माहितीस्तव पाठवलेल्या संदेशात येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर लोकार्पणाचे औचित्य हे नमूद केलेले आहे. आयोजकांनी मात्र त्याचा आणि या उपक्रमाचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे. तसेच ‘श्रीराम मंदिर’ लोकार्पणाची तारीख ठरण्या आधीच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here