Skip to content

Sambhaji Nagar | पेरूचे आमिष देत सहा वर्षीय चिमूरडीवर अमानुष अत्याचार

Sambhaji Nagar

Sambhaji Nagar |  गेल्या काही दिवसांतच छत्रपती संभाजीनगर (Sambhaji Nagar) जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना ह्या दुप्पटीने वाढल्या आहेत. दरम्यान, आता पुन्हा एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना ही येथून उघडकीस आली असून, धक्कादायक म्हणजे यात पाहिल्याच्या वर्गात शिकणाऱ्या चिमूरडीचा विनयभंग करण्यात आला आहे.

ही घटना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात घडली असून, पहिलीत शिकणाऱ्या एका सहा वर्षीय चिमूरडीवर अत्याचार करण्यात आल आहे. ही घटना पैठण तालुक्यातील एका गावामध्ये घडली आहे. दरम्यान, ह्या घटनेनंतर संबंधित आरोपी हा फरार असून, पैठण पोलीस हे त्याचा शोध घेत आहेत. संतापजनक काही दिवसांपूर्वीच या भागात एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार केल्याची घटना ही अगदी आताचीच असताना आता पुन्हा ही घटना उघडकीस आल्याने तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बाळू ज्ञानोबा जाधव असे या नराधम आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sambhaji Nagar)

Love Marriage | जोडप्याने पळून जाऊन लग्न केलं; घरी परतल्यावर दोघांच्या कुटुंबांनी…

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पहिलीच्या वर्गात शिकत असणारी ६ वर्षीय मुलगी ही दुपारच्या सुमारास शाळेतून घरी जात होती. दरम्यान, यावेळी रस्त्यातच या पीडित मुलीला अडवत आरोपी बाळू ज्ञानोबा जाधव याने तिच्यावरती अत्याचार केला. घरी जाताच पीडित मुलीने घडलेला हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला आणि यावरून, पीडित चिमूरडीच्या आईने पैठण पोलीस ठाणे गाठले आणि या घटनेची तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ  संबंधित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि घटनास्थळी भेट दिली. मात्र, हा आरोपी फरार झाला असून, पैठन पोलिसांचे पथक हे त्याच्या मागावर आहेत. (Sambhaji Nagar)

Thirty First | ‘थर्टी फर्स्ट’ला दारू पिताय तर सावधान…!

Sambhaji Nagar | दोन वेळा काढली मुलीची छेड

मिळालेल्या माहितीनुसार, हा नराधम विवाहित आहे आणि त्याला एक मुलगा देखील आहे. तसेच आरोपी हा पिडीत अल्पवयीन मुलीच्या घराजवळ राहत असून, या गावात यापूर्वीही त्याने दोन वेळा पीडित मुलीची छेड काढली असल्याची चर्चा होती. मात्र, आपल्याच गावातील प्रकरण असल्याने त्यावेळी संबंधित ग्रामस्थांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटवण्यात आले. पण आता त्याने या मुलीवर अत्याचार केल्यामुळे गावात संतापाची लाट उसळली आहे. मात्र, पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याचे कळताच आरोपी पसार झाला.(Sambhaji Nagar)

पेरू देतो म्हणून घरात नेले अन्…

दरम्यान, ही पिडीत मुलगी मंगळवार रोजी दुपारच्या सुमारास शाळेमधून घरी जेवण्यासाठी आपल्या चुलत भावासोबत घारी चालली होती. आणि याचवेळी आरोपीने सदर पीडित मुलीला “तुला पेरू देतो”, असे सांगत तिला त्याच्या घरात नेले आणि दरवाजा बंद करून त्याने मुलीवर अमाणुष अत्याचार केले आणि त्यानंतर तो पसार झाला. दरम्यान, यावेळी घाबरलेल्या मुलीने दोन दिवसांनंतर ही घटना आपल्या आई आणि वडिलांना सांगितली. त्यानंतर आरोपीच्या विरुद्ध बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Sambhaji Nagar)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!