New Year 2024 | उद्या ‘हे’ उपाय केल्याने आगामी वर्षातील सर्व समस्या दूर होतील

0
3
New Year 2024
New Year 2024

New Year 2024 |  उद्यापासून २०२४ हे नवीन वर्ष सुरू होणार असून, उद्या म्हणजेच १ जानेवारी रोजी सुरू होत असलेल्या २०२४ या नवीन वर्षाची सुरुवात ही अत्यंत शुभ दिवसाने होत आहे. नवीन वर्षाची सुरुवात ही लोक धार्मिक पद्धतीने करतात. या दिवशी धार्मिक स्थळी किंवा तीर्थ क्षेत्री भेट देतात. जेणेकरून येणारे संपूर्ण वर्ष हे शुभ राहील. दरम्यान, आगामी वर्ष हे एका खास दिवसापासून सुरू होणार आहे.(New Year 2024)

त्यामुळे या दिवशी योग्य पद्धतीने पूजा किंवा काही विशेष कार्य केलीत तर आगामी वर्षभर धन, सुख व आरोग्याची कमतरता भासणार नाही. उद्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच तिथी आणि नक्षत्रांचा विशेष मिलाफ हा तुम्हाला येणारी संकटे व गरिबीपासून दूर ठेवेल. जर तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर उद्याचा शुभ मुहूर्त आणि पुढील पूजा पद्धती जाणून घ्या… (New Year 2024)

New Year 2024 | अशी आहे उद्याची तिथी

ज्योतिष पंचांगानुसार,  १ जानेवारी २०२४ रोजी पंचमी तिथी असणार आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंचमी तिथी ही या वर्षात ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११.५५ वाजेपासून सुरू होणार आहे. तसेच, आगामी वर्षात १ जानेवारी रोजी दुपारी २.२८ वाजता ही पंचमी तिथी समाप्त होणार आहे. येत्या वर्षाचा पहिला वार हा सोमवार आहे.  दरम्यान, सोमवार हा भगवान शंकराला समर्पित असल्याने या दिवशी त्यांची पूजा करून नव वर्षाची सुरुवात केल्यास आगामी वर्ष भरभराटीचे जाईल.

Shani Dev | वर्षातील शेवटच्या शनिवारी शनिदेवांना ‘अशा’ प्रकारे करा प्रसन्न

अशी आहे पहिल्या दिवसाची पूजा पद्धत

१. उद्या म्हणजेच १ जानेवारी २०२४ रोजी प्रातः स्नान करून सर्वप्रथम सूर्य नारायणाला जल अर्पण करावे. या सूर्य उपासनेमुळे जीवनात प्रगतीचे मार्ग हे खुले होतात.
२. आता आपल्या घराच्या मुख्य द्वारावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावावे.

३. तसेच शनिदेवाचा आशीर्वाद मिळावा यासाठी उद्या घराच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाळ लावणेदेखील शुभ समाजले जाते.
४. शिवलिंगावर जल अभिषेक किंवा रुद्र अभिषेक करावा. हिंदू धर्मानुसार, सोमवार हा शंकराच्या अभिषेकासाठी महत्तवाचा मानला जातो.
५. यानंतर बेलाच्या पानावर आपली इच्छा सांगा किंवा लिहावी आणि ती शिवलिंगावर अर्पण करावी असे म्हणतात की या उपायामुळे भगवान शिव हे भक्ताची प्रार्थना लवकर स्वीकारतात आणि पूर्णही करतात.(New Year 2024)

Somvar pooja | दर सोमवारी ‘हे’ उपाय केल्यास अनेक समस्या होतील दूर

६. देवी पार्वतीला लाल चुनरी अर्पण करावी. यामुळे वैवाहिक जीवन हे सुखी व आनंदी होते.

७. तसेच नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी तांदूळ, पांढऱ्या रंगाचे कपडे, पांढरी फुले, साखर व नारळ अशा पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करावे. असे केल्याने कुंडलीतील चंद्र हा बलवान होतो व दोष दूर होतात.

८. यानंतर सायंकाळी पुन्हा शंकराचे पूजन करावे.

९. तसेच घरात बेलाचे रोप लावावे. आणि त्याची काळजी घेण्याची प्रतिज्ञा घ्यावे आणि त्याचे दररोज पूजन करावे. या बेलाच्या रोपामुळे आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी व संपत्ती राहते. (New Year 2024)

(टीप – वरील सर्व बाबी या ‘द पॉइंट नाऊ’ हे केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असते. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here