Skip to content

Love Marriage | जोडप्याने पळून जाऊन लग्न केलं; घरी परतल्यावर दोघांच्या कुटुंबांनी…

Love Marriage

Love Marriage |  प्रेमी युगूलं एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र, घरच्यांनी लग्नाला नकार दिला किंवा नाते स्वीकारळे नाही तर, पळून जाऊन लग्न करण्याचा पर्याय निवडतात. यानंतर तरी घरचे ऐकतील अशी त्यांची अपेक्षा असते आणि काहिंच्या घरचे मान्य करतातही. मात्र, अशीच एक खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगर मधून समोर आली आहे. (Love Marriage)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पदमपुरा येथील मोची गल्ली येथे शेजारीच राहणाऱ्या मुला मुलीने पळून जाऊन आर्य समाज मंदिरात लग्न केलं. मात्र, पंधरा दिवस ते बाहेरच राहिले. दरम्यान, या नंतर ते दोघे घरी परतले. आणि छक्का दाक्षिणात्य सिनेमांमधील अॅक्शन सीन झाला. तसेच यावेळी या दोघांच्या कुटुंबातील तब्बल १८ जण हे एकमेकांवर लाठ्या काठ्या घेऊन तुटून पडले. यावेळी काठ्या, चाकू, दांडे याने त्यांचे एकमेकांना बेदम मारहाण केली. या तूफान राड्यात यपैकी दहा जण हे गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी वेदांत नगर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.(Love Marriage)

Chandwad | चांदवड येथे लाचखोर सरपंच, उपसरपंच एसीबीच्या जाळ्यात

Love Marriage | नेमकं प्रकरण काय..?

याप्रकरणी अधिक माहिती नुसार, छत्रपती संभाजी नगर या शहरातील पदमपुरा ह्या भागात असलेल्या मोची गल्लीत  मेहरा व बरथूने हे कुटंबीय वास्तव्यास आहे. या दोन्ही कुटुंबातील मुलगा आणि मुलीचे अनेक वर्षांपासूनचे प्रेम संबंध होते. दरम्यान, यामध्ये त्यांच्यातील जवळीक वाढली आणि त्या दोघांनी लग्न करायचं ठरवलं. मात्र, हे कळाल्यानंतर त्या दोघांच्या कुटुंबांमधून विरोध झाला आणि याचमुळे दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि आर्य समाज मंदिरात लग्न केलं.(Love Marriage)

दरम्यान, लग्न केल्यानंतर हे दोघेजण तब्बल पंधरा दिवस बाहेरगावीच होते. त्यानंतर घरची परिस्थिती निवळली असेल असे समजून दोघेही घरी परतले. यावेळी दोघांच्या घरातील कुटुंबियांनी विरोध केला. मात्र, त्यानंतर दोन्ही कुटुंबीय हे एकमेकांवर तुटून पडले. आणि यावेळी दोन्ही कुटुंबातील तब्बल १८ जणांनी लाठ्या काठ्या व चाकूने एकमेकांवर वार केले आणि बेदम मारहाण केली. यात तब्बल १८ ते २ जणांनी एकमेकांना बेदम मारहाण केली आणि दहा जण हे गंभीर जखमी झाले आहेत.

Tea | नवऱ्याने गरम चहा मागितला आणि बायकोने त्याच्या डोळ्यातच कात्री खुपसली

दरम्यान, आता या प्रकरणी वेदांत नगर येथील पोलिस ठाण्यात भारत मेहरा, तुषार मेहरा, जयेश मेहरा, सुंदर मेहरा, राजेश मेहरा, गणेश मेहरा, तर संतोष बरथूने, रतन बरथूने, नरेंद्र बरथूने, प्रकाश बरथूने, दिनेश बरथूने, सुमित बरथूने यांच्यासह काही महिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.(Love Marriage)

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!