द्राक्ष बागेत पेटल्या शेकोट्या ; शेतकरी चिंतेत

0
24

नाशिक प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांपासून नाशिक आणि निफाड मधील थंडीचा पारा स्थिर असून, सोमवारी म्हणजेच ७ नोव्हेंबरला निफाड येथे ११.८ अंश तर नाशिकमध्ये १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पारा स्थिर झाला असला तरी थंडीचा कडाका मात्र कायम आहे.

उत्तर भारतामधून येत असलेल्या शीतलहरींमुळे जिल्ह्यामधील तापमानाच्या पार्‍यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठी घसरण झाली आहे. मात्र, मागील गेल्या ४८ तासांपासून नाशिक व निफाड येथील पारा स्थिर झालेला आहे. निफाडमधील गहू संशोधन केंद्रामध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी ११.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पार्‍यातील झालेल्या या घसरणीमुळे अवघा निफाड तालुका गारठला आहे. थंडीच्या वाढत्या कडाक्यामुळे तालुक्यातील द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. त्याचा मोठा फटका द्राक्षबागांना बसत आहे. थंडीपासून बागांचे रक्षण करण्यासाठी पहाटे द्राक्षबागांमध्ये शेकोट्या पेटविल्या जात आहेत. नाशिकात थंडीचा जोर कायम आहे. रात्री व पहाटेच्या वेळेस थंड वार्‍यांचा वेग अधिक असल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. जिल्ह्याच्या इतर भागातदेखील थंडीचा जोर जाणवत असल्याने ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, हिमालयाकडून येत असणाऱ्या शीतवार्‍यांचा वेग हा कायम असल्याने येणार्‍या काळात जिल्ह्याच्या पार्‍यामध्ये मोठी घसरण होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here