टाकेदच्या शेतकऱ्याने भाताचे घेतले रेकॉर्डब्रेक उत्पन्न सर्वत्र या वाणाची चर्चा

0
4

राम शिंदे | सर्वतीर्थ टाकेद
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथील प्रगतिशील शेतकरी सवळीरामशेठ कदम यांनी गतवर्षी नूजिवीडू सिड्स कंपनीच्या एन पी १२५ या भाताच्या वाणाची लागवड केली होती ही लागवड पारंपरिक पद्धतीने करण्या ऐवजी शेण खत सेंद्रिय खतांचा वापर करत जपानी पद्धतीने केली होती.

यात त्यांनी १५ इंच लांबी रुंदी वर जपानी पद्धतीने कमी काडीत चुडाची लागवड केली होती. यात त्यांना सात एकर साठी कमी खर्च, कमी रोप व वेळेची बचत होत कमी मजुरी लागली आहे सध्या हे भात जवळपास चार ते पाच फूट उंचीपर्यंत मजबूत काडीत ताट उभे आहे. एका लोंबटीत जवळपास तीनशे पन्नास दाणे असतात असा नूजिवीडू कंपनीचा दावा आहे.

या भाताच्या वाणात काडीला फुटवे जास्त असतात,या प्रजातीवर रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो शक्यतो रोग जातच नाही. यावर्षी शेतकरी कदम यांनी शेणखताची जास्त मात्रा देऊन लागवड केल्याने रासायनिक खतांचा कमी वापर केला आहे. यावर्षी त्यांचे भात शेती अतिवृष्टीत देखील एकदम जोमात आली आहे. दरम्यान या काढणीवर आलेल्या पिकांची नूजिवीडू कंपनीने प्रत्यक्षात पाहणी करत गावातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र घेत मार्गदर्शन कार्यक्रम घेतला या कार्यक्रमात कंपनीने प्रात्यक्षिक मध्ये अडीच बाय अडीच मीटर क्षेत्र कापणी करून त्याच्या भाताचे वजन केले. व भाताचा रेशो मोजमाप केले.

यात अडीच बाय अडीच मीटर ला कमीतकमी 5 kg भात मिळाले व वजण करून त्याचा प्रत्यक्षात अंदाज घेतला यात गुंठ्याला एक पोत असे ऍव्हरेज मिळाले म्हणजेच एकरी चाळीस पोते व कमीतकमी 32 पोते। उत्पन्न हे नक्की मिळते असे कंपनीने यावेळी सिद्ध प्रत्यक्षात करून दाखवले.शक्यतो हे भात १००८ या भाताच्या प्रजातीचे आहे असे मत शेतकरी सवळीराम कदम यांनी बोलतांना व्यक्त केले.

या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे, आदर्श शेतकरी जगण घोडे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, कृषी सेवा केंद्र चालक महावीर शहा, जेष्ठ नागरिक आबाजी बारे,मनसेचे शेतकरी कार्यकर्ते सागर गाढवे, दत्तात्रय कदम, ढेंगळे गुरुजी,गणेश दूरगुडे,बबन बांबळे, मधुकर भोईर आदींसह बहुसंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रगतिशील शेतकरी सावळीराम शेठ कदम यांचा नूजिवीडू सिड्स कंपनीकडून सन्मान करण्यात आला. यावेळी कंपनीचे एरिया सेल्फ मॅनेजर संतोष कुमार ढासळकर,मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर प्रवीण जाधव, विभागीय व्यवस्थापक पश्चिम महाराष्ट्र कोकण प्रशांत काठोळे आदी उपस्थित होते.

“कमितकमी खर्चात सेंद्रिय खतांची मात्रा देऊन जास्त उत्पन्न देणारी एन पी १२५ ही भाताची प्रजात आहे या वानाची अन्य शेतकऱ्यांनी देखील जास्तीत जास्त लागवड करावी”
– सावळीराम कदम , शेतकरी सर्वतीर्थ टाकेद बु.

“कमी खर्च,कमी रोप,आणि कमीतकमी खतांचा वापर करून कोणताही आजार रोग या प्रजातीवर जात नाही त्यामुळे कमी खर्चात जास्तीतजास्त उपयुक्त उत्तम दर्जाचा तांदूळ देणारी एन पी १२५ या भाताच्या वानाची सर्वांनी लागवड करावी.”
प्रशांत काठोळे विभागीय व्यवस्थापक पश्चिम महाराष्ट्र कोकण

“यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी आमच्या कृषी सेवा केंद्रातून NP१२५ या भाताच्या वानाची लागवडीसाठी खरेदी केली आहे.हे यावर्षी आमच्या निदर्शनास आले आहे.हे वाण खूप चांगल्या पद्धतीने कमीतकमी खर्चात १००८ च्या बरोबरीचे आहे.”
महावीर शहा, महावीर कृषी सेवा केंद्र चालक टाकेद.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here