देवळा : रविवारी दि.६ रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास गिरणा नदी पुलावरून रोशन गोकुळ कुमावत ( वय २१) रा सटाणा या युवकाने उडी घेतली होती . या युवकाचा मृतदेह आज सकाळी १० वाजता सापडला असून काल रात्री पुन्हा एका युवकाने उडी टाकल्याने हा मूळ मृत्यूचे केंद्र बनत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. याठिकाणी सुरक्षा जाळी बसवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
या युवकाच्या तपासासाठी सोमवारी सकाळी लोहोणेर येथील स्थानिक पोहणारे तरुण व देवळा पोलीस यांची शोधमोहीम सकाळपासून सुरू असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्या हाती एक मृतदेह लागला असता. “शोधायला गेले एकाला सापडला दुसराच कोणी तरी ” असा प्रकार सोमवारी सकाळी तालुक्यातील गिरणा नदी पात्रात शोध मोहिमेत घडूनआल्याने अनेक तर्कवितर्क वर्तविण्यात आले .
याबाबत पोलीस यंत्रणा चिंतीत झाली होती. याबाबतचे वृत्त असे की, रविवारी दि.६ रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास गिरणा नदी पुलावरून युवकाने उडी मारल्याची घटना घडली. सदर युवक रोशन गोकुळ कुमावत ( वय २१) हा सटाणा येथील असुन या युवकाच्या तपासासाठी सोमवारी सकाळी येथील स्थानिक पोहणारे तरुण व देवळा पोलीस यांची शोधमोहीम सकाळपासून सुरू असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्या हाती एक मृतदेह लागला असता.
ओळखीसाठी म्हणून रोशन कुमावत याच्या कुटुंबियांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी सदर मृतदेह रोशन कुमावत याचा नसल्याचे सांगितले.शोधायला गेले एकाला सापडला दुसराच असा प्रकार घडल्याने सापडलेला मृतदेह नक्की कोणाचा हाच प्रश्न देवळा पोलिसां समोर उभा राहिला होता. रविवारी रात्रीच्या अंधारात गिरणा नदी पात्रात उडी घेणाऱ्या रोशन कुमावतचा सोमवारी सायंकाळ पर्यत शोध घेण्यात येत होता. दरम्यान ,मंगळवारी सकाळी त्याचा शोध लागला असून, देवळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम