Nashik Vidhansabha | युवा पिढीलाही आमदारकीचे डोहाळे; नाशिकमधील ‘या’ मतदारसंघांत बाप-लेकातच लढत..?

0
101
Nashik Vidhansabha
Nashik Vidhansabha

Nashik Vidhansabha :  राज्यात सध्या आगामी विधानसभेचे जोरदार वारे वाहत असून, या पार्श्वभूमीवर अनेक ज्येष्ठ नेत्यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या राजुभरात निष्ठावंतांचे मेळावे घेत असून, नुकताच त्यांचा नाशिक दौरा झाला. मात्र, या मेळाव्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना घडली. दिंडोरी मतदार संघाचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी शरद पवार गटाच्या मेळाव्यात हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

मात्र, यावेळी आगामी काळात दिंडोरीत बाप विरुद्ध लेक अशी लढत रंगण्याची शंका स्पष्ट झाली. दरम्यान, निवडणूकीच्या तोंडावर आता नव्या पिढीलाही आमदारकीचे डोहाळे लागल्याने दिंडोरीसह नाशिकच्या आणखी काही मतदारसंघांमध्ये कुटुंबातच आणि विशेष म्हणजे बाप लेकांतच उमेदवारीसाठी लढत सुरू असल्याचे दिसत आहे.

‘या’ मतदारसंघांत रंगणार बाप-लेक लढत..?

नाशिक जिल्ह्यात सिन्नर, दिंडोरी, कळवण-सुरगाणा या मतदारसंघांमध्ये थेट विविध विधानसभा मतदारसंघात एकाच कुटुंबातील अनेक उमेदवारी इच्छुक असल्याचे चित्र आहे. राज्यात काका पुतण्यानंतर आता नाशिक जिल्ह्यात थेट बाप लेकातच फुट पडल्याचे दिंडोरीत स्पष्ट झाले असून, अशीच परिस्थिती कळवण-सुरगाणा मतदारसंघात आहे. येथे मविआकडून माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असून, त्यांचे पुत्र इंद्रजीत गावितही विधानसभेसाठी उत्सुक आहेत. त्यांनी यापूर्वीही अन्य पक्षांकडे उमेदवारीसाठी चाचपणी केल्याची माहिती आहे.

नाशिकमधील एक आमदार वगळता सर्वच आमदारांनी पक्षांमध्ये फुट पडल्यानंतर सत्ताधारी महायुतीकडे मोर्चा वळवल्याने विरोधकांकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. यातच आता विद्यमान आमदारांच्या कुटुंबीय आणि मुलांकडूनच थेट उमेदवारीसाठी वरिष्ठांच्या गाठीभेटी घेतल्या जात असून, उमेदवारीसाठी चाचपणी सुरू असल्याने विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबातील दोन लोक विरोधात उभे राहिल्यासही काही आश्चर्य वाटणार नाही.(Nashik Vidhansabha)

Vidhansabha Election | उद्धव ठाकरे विधानसभेबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..?; बैठकीत काय चर्चा

Nashik Vidhansabha |  दिंडोरीत पिता-पुत्रातच लढत रंगणार..?  

दिंडोरी मतदार संघात गोकुळ झिरवाळ यांनी  शरद पवार गटाकडे विधानसभेची उमेदवारी मागितल्याचे समोर आले असून, त्यांनी यापूर्वी लोकसभेच्या उमेदवारीसाठीही इच्छा व्यक्त केली होती. गोकुळ झिरवाळ यांनी त्यांचे वडील नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असून, दिंडोरी मतदार संघातून शरद पवार गटाकडे उमेदवारीची मागणी केल्याचे समजते. त्यामुळे या मतदार संघात आगामी काळात पिता- पुत्र एकमेकांविरोधात उभे राहिल्यास काही आश्चर्य वाटणार नाही. (Nashik Vidhansabha)

Raj Thackeray | राज ठाकरेंची घोषणा.! महायुतीसोबत काडीमोड; काहीही करून आमदारांना सत्तेत बसवणार

सिन्नरमध्ये बाप लेकीसाठी त्याग करणार..?

दरम्यान, सिन्नर विधानसभा मतदारसंघात माणिकराव कोकाटे हे विद्यमान आमदार असून, त्यांच्या कन्या सीमांतिनी कोकाटे या जिल्हा परिषद सदस्य आहेत. मात्र, आता ताईंनी विधानसभेवर जावे आणि युवा नेतृत्वाला संधी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. यासाठी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या वाजेंविरोधात कोकाटे यांनी निवडणूक लढवावी म्हणजे आ. कोकाटे लोकसभेवर गेल्यास त्यांच्या कन्येचा विधानसभेचा मार्ग मोकळा होईल, ही स्ट्रॅटजी होती.

कोकाटे पुन्हा आमदार झाल्यास ही त्यांची पाचवी टर्म असल्याने त्यांची मंत्रीपदी वर्णीही लागू शकते. त्यामुळे सीमांतिनी कोकाटे यांच्या उमेदवारीची शक्यता कमी असली तरी पूर्णपणे मावळलेली नाही. कारण यानंतर पुढील निवडणुकीसाठी थेट पाच वर्ष वाट पहावी लागणार असल्याने ही संधी सोडण्यास युवानेते तयार नाही. दरम्यान, असे असले तरी राजकारणात कधी काय होईल, काही सांगता येत नाही. त्यामुळे कोणाविरुद्ध कोणाचे आव्हान उभे ठाकणार यासाठी विधानसभेची वाट पहावी लागणार आहे. पण महाराष्ट्र विधानसभेच्या या निवडणुकीत अनेक ट्विस्ट आणि चढ उतर पहायला मिळतील. यात शंकाच नाही. (Nashik Vidhansabha)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here