Vidhansabha Election | उद्धव ठाकरे विधानसभेबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..?; बैठकीत काय चर्चा

0
48
Vidhansabha Election
Vidhansabha Election

Vidhansabha Election :   लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अनेक नेत्यांचे राज्यभरात पक्ष बळकटीसाठी दौरे सुरू आहेत. तर, काही पक्षांनी आपल्या मार्केटिंगवर विशेष लक्ष दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून महायुतीने धडा घेतला असून, ते आपल्या कमकुवत बाजुंवर काम करताना दिसताय. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या पक्षांना लोकसभेच्या विजयानंतर चांगलाच कॉन्फिडन्स आला असून, जागावाटपासाठी तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे दिसत आहे.

तर, काही पक्षांची स्वबळावरही निवडणूक लढण्याची तयारी असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ट्रायडेंट हॉटेलमध्ये एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढण्याची तयारी दर्शवली असून, त्यांनी पक्षातील नेत्यांसोबत सर्व 288 जागांचा आढावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.  (Vidhansabha Election)

स्वबळावर निवडणूक लढवण्याची संभाव्य कारणे..?

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेससोबत युती करत निवडणूक लढवली. यामुळे मर्यादित जागांवरच ठाकरेंना निवडणूक लढवावी लागल्याने ठाकरेंचा स्ट्राइकरेट कमी झाला. तसेच युतीत ठाकरेंना पारंपारिक किंवा इतर पक्षांच्या तुलनेत अधिक ताकद असलेल्या जागांवरच निवडणूक लढवता येईल, तसेच सांगली लोकसभेसारखा वादही उद्भवू शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवू शकते. (Vidhansabha Election)

Vidhansabha Election | शरद पवार गट विधानसभेच्या ‘या’ ६ जागा लढवणार..?

Vidhansabha Election | आघाडीत ठाकरे या जागांसाठी आग्रही..?

दरम्यान, जरी ठाकरे गटाने युतीत निवडणूक लढवली. तर मुंबई, कोकण, मराठवाडा हा भाग उद्धव ठाकरे गटाचा बालेकिल्ला असून, या भागातील अधिकाधिक जागांसाठी ठाकरे गट आग्रही असेल. ट्रायटेंड हॉटेलवर झालेल्या पक्षाच्या बैठकीत महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शरद पवार गटाला किती जागा मिळू शकतात. याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. तर, महाविकास आघाडीत सध्या 90-90-90 जागांचा फॉर्म्युला चर्चेत असून, उर्वरित जागा या मित्रपक्षांना सोडल्या जाण्याचे महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांचे मत आहे.

लोकसभेच्या आकडेवारीनुसार राज्यात कोणाची चलती..?

1. महाविकास आघाडी – 30 + 1 अपक्ष (काँग्रेस)

  • काँग्रेस – 13 जागा
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) – 8 जागा
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 9 जागा

2. महायुती – 17

  • भाजप – 9 जागा
  • शिवसेना (एकनाथ शिंदे) – 7 जागा
  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – 1 जागा

Vidhansabha Election | महाविकास आघाडीत बिनसलं..?; काँग्रेसचीही स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here