Vidhansabha Election | शरद पवार गट विधानसभेच्या ‘या’ ६ जागा लढवणार..?

0
22
Vidhansabha Election
Vidhansabha Election

मुंबई :  लोकसभा निवडणुकांचे वारे शांत होते तोच आता राज्यात विधानसभा (Vidhansabha) निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचे दिसत आहे. महायुती लोकसभा निवडणुकीतील पराजय विजयात बदलण्यासाठी तर महाविकास आघाडी लोकसभेचा विजय विधानसभेतही टिकवून ठेवण्यासाठी जोमाने आतापासूनच तयारीला लागले आहे. एवढेच नाहीतर अजून विधानसभेला अंदाजे ३ ते ४ महीने शिल्लक असून, आताच दोन्ही गटांत जागावाटपाची चर्चादेखील सुरू आहे. महाविकास आघाडीचे सूत्र जवळपास निश्चित झाले असून महायुतीत अद्याप चढाओढच सुरू असल्याचीही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले होते. तर, दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबईतील ६ जागांसह विधानसभेच्या १०० जागांसाठी तयारी सुरु केली आहे. शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला असून, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा मुंबईत ६ जागा लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Lok Sabha Oath Ceremony | शपथ घेताना बाळासाहेबांचे नाव घेतल्याने अडवलं; तर, लंकेंनी विखेंची अशी जिरवली

Vidhansabha Election | ‘या’ जागांवर शरद पवार गटाचा दावा 

तर, मलबार हिल, भायखळा, विक्रोळी, सायन-कोळीवाडा, अनुशक्ती नगर-कुर्ला, दिंडोशी-वर्सोवा, अंधेरी पश्चिम, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि शिवाजीनगर-मानखुर्द यापैकी ६ जागांवर शरद पवार गट दावा करण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन मुंबईतील विधानसभेच्या जागांचा प्रस्ताव सादर करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस लढवू इच्छित असलेल्या मतदारसंघांमध्ये मलबार हिल, भायखळा, विक्रोळी, सायन-कोळीवाडा,अनुशक्ती नगर-कुर्ला, दिंडोशी-वर्सोवा, अंधेरी पश्चिम, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि शिवाजीनगर-मानखुर्द यांपैकी किमान ६ जागा महाविकास आघाडीतील जागावाटपात मागण्याची शक्यता आहे. राखी जाधव लवकरच शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मुंबईतील विधानसभेच्या जागांचा प्रस्ताव सादर करणार आहेत.

Maharashtra Elections | विधानपरिषदेतच महायुतीत फुट..?; मनसे विरुद्ध भाजप लढतीची घोषणा

६ जागा पवारांना बाकी ठाकरे अन् काँग्रेसला 

मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघांपैकी मुंबई उत्तर-पश्चिममधून रवींद्र वायकर आणि उत्तर मुंबईतून पियुष गोयल हे वगळता इतर चारही जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला होता. मुंबईत विधानसभेच्या एकूण ३६ जागा असून, त्यापैकी ६ जागांची शरद पवार गटाची मागणी असून, इतर जागा या ठाकरे गट आणि काँग्रेसला सोडल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा मिळणार हे येणार काळातच स्पष्ट होईल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here