Nashik Teachers Constituency Election | सस्पेन्स संपला; नाशिकचा गड शिंदेंच्या शिवसेनेनेच राखला

0
33
Nashik Teachers Constituency Election
Nashik Teachers Constituency Election

Nashik Teachers Constituency Election |  अखेर नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निकालाचा सस्पेन्स संपला असून, नाशिकचा गड राखण्यात शिंदे गटाला यश आहे. नाशिक शिक्षक मतदार संघातील ही लढत चुरशीची आणि प्रतिष्ठेची होती. कारण स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासाठी मैदानात उतरावे लागले होते. तर, येथे महायुतीतच दुमत झाल्याने किशोर दराडे आणि शिंदे गटासमोर महायुतीतून मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाचेच आव्हान होते. तर, उशीरापर्यंत चाललेल्या या मतमोजणीत शिंदे गटाच्या  किशोर दराडे यांनी बाजी मारली असून, नाशिक शिक्षक मतदार संघात किशोर दराडे विजयी झाले आहेत.

Nashik Teachers Constituency Result | नाशिकमधील मतमोजणीतील गोंधळाची उद्धव ठाकरेंकडून दखल; मातोश्रीवरून नाशिकमध्ये लक्ष

त्यांच्या विजयाची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. दुसरीकडे नाशिक शिक्षक मतदार संघात अजित पवार गट विरोधात असल्याने येथे नाशिक जिल्ह्यातील दोन्ही पक्षांचे मंत्री दादाजी भुसे आणि मंत्री छगन भुजबळ यांचेही राजकीय कसब पणाला लागलेले होते. दरम्यान, नाशिकचे पालकमंत्री दादाजी भूसेंच्या सूक्ष्म नियोजनाने हा विजय सुकर झाला. नाशिक शिक्षक मतदार संघाच्या चौरंगी लढतीत शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे विजयी जाहले असून, दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि तिसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे संदीप गुळवे आहेत. (Nashik Teachers Constituency Election)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here