Nashik Teachers Constituency Result | नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर पुन्हा गोंधळ; ठाकरे गटाची कारवाईची मागणी

0
56
Nashik Teachers Constituency Result
Nashik Teachers Constituency Result

Nashik Teachers Constituency Result : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेचा आज निकाल जाहीर होणार असून, सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू आहे. या संपूर्ण निवडणुकीदरम्यान नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली. मात्र, सकाळी मतपेटीत तीन मतपत्रिका अधिक आढळल्याने ठाकरे गटाने आक्षेप घेत मतमोजणी थांबवली होती. प्राथमिक फेरीत 64 हजार 848 मतपत्रिका अपेक्षित असून, तीन मतपत्रिका जास्त आढळून आल्या. तर, यामुळे काहीकाळ गोंधळही झाला होता. यानंतर मतपत्रिका जास्त असलेल्या टेबलवर पुन्हा मोजणी करण्यात आली. तर, यानंतर आता पुन्हा मतपेटीत दोन मतपत्रिका जास्त आढळल्या आहेत.

Nashik Teachers Constituency Result | नाशिकमध्ये नवा ट्विस्ट; इतर पक्षांकडून अपक्ष उमेदवाराला छुपा पाठिंबा मिळाला..?

Nashik Teachers Constituency Result | नेमकं काय घडलं..?

दरम्यान, आता नाशिकमध्ये मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा गोंधळ झाला असून. दोन मतपत्रिका जास्त आढळल्या आहेत. नाशिकमधील निफाड आणि येवला या दोन्ही तालुक्याच्या मतपेटीत १ मतपत्रिका जास्त आढळून आली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून, (Shiv Sena Thackeray Camp) त्यांनी आक्षेप घेतला आहे.

तर, सकाळी चोपडा तालुक्यातील मतपेटीत ३  मतपत्रिका जास्त आढळल्या होत्या. यामुळेही गोंधळ उडाला होता. या जास्तीच्या पाचही मतपत्रिका बाजूला काढून ठेवत मतमोजणी प्रक्रिया सुरळीत करण्यात आली आहे. या मतपत्रिकांचे काय करायचे..? याबाबत अंतिम टप्प्यात निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, या प्रकरणामुळे मतमोजणी केंद्रावर एकच खळबळ उडाली असून, गोंधळ निर्माण झाला आहे.

Nashik Teachers Constituency Result | नाशिकमध्ये ठाकरे गट आक्रमक; मतमोजणी थांबवण्याचा निर्णय..!

आम्हाला यावर संशय आहे; तपास करा 

दरम्यान, या प्रकरणी नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले असून, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. “मतमोजणी कक्षातील २२ नंबरच्या मोजण्यात आलेल्या टेबलवर चोपडा तालुक्यातील मतपेटीत ३ मतपत्रिका जास्त आढळल्या. या मतपेटीत मतपत्रिका जास्त कशा आल्या..?

याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी द्यायला हवी. ज्यावेळी मटपेट्या सील केल्या जातात तेव्हा त्यावर अधिकाऱ्यांच्या सह्या असतात. त्यामुळे मतपत्रिका जास्त आढल्याने आम्हाला यावर संशय आहे. हे मतदान केंद्र ज्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत येते त्यावर कारवाई करा आणि या मतपत्रिका नंतर टाकण्यात आल्या आहेत का..? याचा सखोल तपास करण्याची मागणी  नाशिक ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here