Nashik Teachers Constituency Result | नाशिकमध्ये नवा ट्विस्ट; इतर पक्षांकडून अपक्ष उमेदवाराला छुपा पाठिंबा मिळाला..?

0
27
Nashik Teachers Constituency Result
Nashik Teachers Constituency Result

Nashik Teachers Constituency Result :  विधान परिषदेच्या ४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार असून, सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तर, तीन मतपत्रक जास्त असल्याने ठाकरे गटाने आक्षेप घेतला. यामुळे मतमोजणी थांबवण्यात आली होती. यानंतर त्या टेबलवर पुन्हा मतपत्रकांची मोजणी करण्यात आली. दरम्यान, हे प्रकरण शांत होते तोच आता अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी नवा दावा केला आहे.

महायुतीकडून (Mahayuti) दोन उमेदवार असल्यामुळे महायुतीत सुसूत्रता नव्हती हे दिसून आले आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारामुळे महाविकास आघाडीत अंतर्गत नाराजी पसरली. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाचा मला फायदा होणार असल्याचे कोल्हे म्हणाले. तसेच निवडणुकीदरम्यान झालेले आरोप प्रत्यारोप, बोगस मतदान, मला इतर पक्षातील नेत्यांकडून मिळालेला छुपा पाठिंबा यावर १०० टक्के पहिल्या पसंतीत माझाच विजय होणार असा विश्वास अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता नाशिकच्या या चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार..? यासह विवेक कोल्हे यांना कोणाचा पाठिंबा मिळाला..? याबाबतही उत्सुकता आहे. (Nashik Teachers Constituency Result)

Nashik Teachers Constituency Result | नाशिकमध्ये ठाकरे गट आक्रमक; मतमोजणी थांबवण्याचा निर्णय..!

Nashik Teachers Constituency Result | निवडणुकीची पात्रता खालवण्याचा प्रयत्न झाला

निवडणूक लढवताना निवडणुकीची पात्रता खालवण्याचा प्रयत्न झाला. बोगस शिक्षक मतदान नोंदणी करण्यात आली त्या विरोधात आम्ही भूमिकाही घेणार आहोत. महायुती आणि महाविकास आघाडीतच अंतर्गत सुसूत्रता नव्हती. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीचा नाराजीचा मला फायदा होणार असून, ऐतिहासिक निकाल येणार असल्याचा विश्वासही यावेळी विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला.

न निकालाच्या कोल्हेंचा खळबळजनक दावा

ही लढाई सत्य विरुद्ध सत्ता, आणि अपमान विरुद्ध स्वाभिमान, अशी होती. तर, या निवडणुकीत झालेल्या बोगस मतदानावर आम्ही पुढील काळात कायदेशीर कारवाई करणार असून, निवडणुकीत शिक्षक मतदारांना पैसे वाटप करत प्रलोभन करण्यात आले. तसेच शाळेत जाऊन शिक्षकांना पैसे वाटल्याचे आरोपही यावेळी विवेक कोल्हे यांनी शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यावर नाव न घेता केला. मला मिळालेल्या छुप्या पाठिंब्यावर मला विजयाची शंभर टक्के खात्री असल्याचा खळबळजनक दावा विवेक कोल्हे यांनी केला असून, यामुळे ऐन निकालाच्या दिवशी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Nashik Teachers Constituency Result)

Nashik News | नाशिकमध्ये दादा गटाला मोठा धक्का; आमदाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here