Nashik Teachers Constituency Election | नाशकात शिंदे-पवार गट विरोधात; भुसे-भुजबळांची प्रतिष्ठा पणाला

0
33
Nashik Teachers Constituency Election
Nashik Teachers Constituency Election

Nashik Teachers Constituency Election :  राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदार संघांच्या निवडणुका सुरू आहेत. यात ४ मतदार संघांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. दरम्यान, नाशिक शिक्षक मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये बिनसल्याचे पहायला मिळाले. एकीकडे महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आली असली तरीही कॉंग्रेसनेही उमेदवार दिला होता. मात्र, दिल्लीतून हस्तक्षेप झाल्यानंतर कॉंग्रेसने नाशिकमधून माघार घेतली.

तर, दुसरीकडे महायुतीत नाशिकची जागा शिंदे गटाकडे असून, याठिकाणी अजित पवार गटानेही उमेदवार दिल्याने नाशिक शिक्षक मतदार संघात महायुतीत फाटाफुट झाल्याचे दिसत आहे. नाशिक शिक्षक मतदार संघात शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade), अजित पवार गटाचे धुळे येथील महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar), ठाकरे गटाचे संदीप गुळवे (Sandeep Gulve), आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) अशी चौरंगी लढत रंगली आहे. (Nashik Teachers Constituency Election)

मात्र, वास्तविक पाहता महायुतीचेच दोन्ही पक्ष विरोधात असल्याने महायुतीच्या नाशिकमधील दोन्ही ज्येष्ठ मंत्र्यांची प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे (Dada Bhuse) यांचे राजकीय कसब पणाला लागले आहे. नाशिक लोकसभेप्रमाणे नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूकही चुरशीची बनली असून, यात रोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत.

Nashik Teachers Constituency | भुजबळांचं नेमकं चाललंय काय..?; नाशिकमध्ये असूनही युतीच्या बैठकीकडे भुजबळांची पाठ

Nashik Teachers Constituency Election | उमेदवारांपेक्षा दोन्ही नेत्यांचीच परीक्षा

नाशिक शिक्षक मतदार संघात शिंदे गटाचे किशोर दराडे हे आमदार असून, महायुतीत ही जागा शिंदे गटालाच मिळाली आहे. मात्र, अजित पवार गटानेही आपला उमेदवार दिल्याने येथे महायुतीचेच दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. तर, आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी या दिग्गज मंत्र्यांनाही आपली राजकीय कसब वापरावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांपेक्षा जिल्ह्यातील या दोन्ही नेत्यांचीच परीक्षा या निमित्ताने होणार असून, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. (Nashik Teachers Constituency Election)

दोन्ही पक्षांकडून बैठकांचे सत्र

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या सर्व पक्षांची बैठक पार पडली. तर, जिल्ह्यात असूनही या बैठकीला मंत्री छगन भुजबळ उपस्थित नसल्याने चर्चांना उधाण आले. यानंतर सोमवारी नाशिकमधील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी पक्षाचे उमेदवार महेंद्र भावसार यांच्या प्रचारार्थ बैठक आयोजित केली होती. यामुळे आता दोन्ही पक्षांनी कंबर कसून प्रचार सुरू केला असून, ही जागा महायुती राखणार की महाविकास आघाडीला यश मिळणार हे बघणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Nashik Teachers Constituency Election)

Nashik Teachers Constituency | नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या लढतीत दिंडोरी लोकसभेचा ‘तो’ फॉर्म्युला..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here