Dada Bhuse on Sanjay Raut | राऊत सर्वात मोठा डोमकावळा, घाबरतो का मी…; भुसेंचा राऊतांवर पलटवार

0
54
Dada Bhuse on Sanjay Raut
Dada Bhuse on Sanjay Raut

Dada Bhuse on Sanjay Raut : उद्या शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन असून, या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांच्या वतीने वर्धापन दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. तर, दुसरीकडे या पक्षांचे नेत्यांमध्ये आता वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावरून जुंपल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर तोंड डागली. तयार यावर मंत्री दादाजी भुसे (Dada Bhuse) यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Dada Bhuse on Sanjay Raut | काय म्हणाले होते संजय राऊत..?

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी तब्बल ५८ वर्षांपूर्वी  शिवसेनेचा पाया घातला आणि ५८ वर्षांपासून बाळासाहेबांची शिवसेना ही महाराष्ट्रात काम करत आहे. तेव्हापासूनच आमच्यासारख्या त्यांच्या विचारांनी भारावलेल्या सर्व तरुणांनी शिवसेनेचा भगवा झेंडा आमच्या खांद्यावर घेतला. त्यानंतर आम्ही अनेक संकटांना सामोरे गेलो.

या पक्षासाठी आमच्या कित्येक जुन्या सहकाऱ्यांनी बलिदानदेखील दिले. आम्ही सर्वांनी तुरुंगवासही भोगला. मात्र शिवसेनेशी इमान कायम ठेवले. आता जर कोणी ते शिंदे गट म्हणत असतील की आमची शिवसेना ही खरी तर त्यांनी आधी स्वतःला आरशात पहावे. ज्यावेळी बाळासाहेबांची शिवसेना स्थापन झाली. तेव्हा हे कुठे होते..? कुठल्या गोधडीत हे रांगत होते

आणि उद्या ते काहीतरी डोम नावाच्या सभागृहात कुठेतरी हे सर्व डोम कावळे जमणार आहेत. तर, बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्या लोकांनी शिवसेनेचा वर्धापनदिन (Shiv Sena Foundation Day) साजरा करू नये, अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली होती. तसेच यावेळी बोलताना त्यांनी मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा (Mumbai North West Loksabha) मतदारसंघातील निकलावरूनही शिंदे गटावर टिका केली.

Sanjay Raut | वायफळ बडबड करण्यापेक्षा..; मालेगाव कोर्टाने राऊतांना झापले

आम्ही गोधडीत होतो, तर राऊत कुठे होते

दरम्यान, संजय राऊत यांच्या टिकेला दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले असून, ते म्हणाले की,”सर्वात मोठा डोमकावळा हा तर संजय राऊत आहे. घाबरतो का मी त्याला”, असा एकेरी उल्लेख करत संजय राऊत यांच्यावर मंत्री दादा भुसे यांनी जोरदार पलटवार केला. तर, शिवसेना पक्षाच्या स्थापनेवेळी आम्ही जर गोधडीत होतो. तर हे संजय राऊत कुठे होते.

ते तर तेव्हा कारकूनी करत होते आणि आता त्यांना वेगळ्या पदाचे वेध लागले आहेत. आम्ही शिवसेना पक्षाचे विचार सोडलेले नाही. जिथे जिंकून येतात त्या ठिकाणी ईव्हीएमवर त्यांच्याकडून प्रश्न उपस्थित केला जात नाही. मात्र, जिथे पराभव होतो. तिथे लगेच ईव्हीएमकडे बोट दाखवले जाते. तसेच पुढील चार महिनेही असाच खोटा नेरेटिव्ह सेट केला जाणार असल्याचे मंत्री दादाजी भुसे म्हणाले.

Dada Bhuse | कुणी गल्लीत विचारत नाही अन् बाता मात्र…; भुसेंनी राऊतांना फटकारले


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here