Nashik Teachers Constituency : थेट मुख्यमंत्र्यांच्या एंट्रीने नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही आता हायव्हॉल्टेज झाली असून, रोज नवनवीन ट्विस्ट येताना दिसत आहेत. नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक शिक्षक मतदार संघातील उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ बैठका घेतल्या. यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिकच्या निवडणुकीत शिंदे गटाकडून शिक्षक मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचे आरोप केले होते.
Nashik Teachers Constituency | शिक्षक मतदारांना भेटवस्तू वाटप
यानंतर आता पुन्हा नाशिक शिक्षक मतदारसंघातील शिक्षक मतदारांना महिलांना नथ आणि पुरुषांना कपडे देण्यात आल्याचे आरोप शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्याकडून करण्यात आले आहेत. ज्या भागात साने गुरुजी हे शिक्षक होते. त्याच नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानासाठी महिला शिक्षकांना नथ तर पुरुष शिक्षकांना किंमती वस्त्र देण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचा दावा शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांनी केला असून, या प्रकरणी निवडणूक आयोगाने (Election Commission) तात्काळ दखल घेऊन कारवाई करवी अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Nashik Teachers Constituency)
नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे (Kishor Darade), अजित पवार गटाचे महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar), महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Camp) संदीप गुळवे (Sandeep Gulve), तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात ही लढत रंगली आहे. २६ जूनला या जागेसाठी मतदान होणार असून, मतदानासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
मागील निवडणुकीत पैठणीमुळे वाद
नाशिक शिक्षक मतदार संघाच्या मागील निवडणुकीतही महिला शिक्षक मतदारांना पैठणी वाटण्यत आली होती. तर, यामुळे वादही झाला होता. काही ध्येयवादी शिक्षकांनी या वाटण्यात आलेल्या पैठण्या जाळून या प्रकाराचा निषेधही केला होता. त्यावेळीही या प्रकाराची हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र, याही निवडणुकीत पुन्हा तेच घडत असून, काही उमेदवार पुन्हा शिक्षकांना वस्तू वाटप करत असल्याच्या चर्चा आहेत. (Nashik Teachers Constituency)
यावेळी पुरुष शिक्षक मतदारांना रेमंड कंपनीचे सफारीचे कापड व महिला शिक्षक मतदारांना नथ दिली जात असून, या वस्तूंचे फोटो सोशल मीडियावर व्हेरल होताना दिसत आहेत. जळगाव जिल्ह्यात तर थेट शाळेत जाऊन या भेट वस्तूंचे वाटप करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि कारवाई करण्याची मागणी शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आली आहे.
Nashik Teachers Constituency Election | नाशकात शिंदे-पवार गट विरोधात; भुसे-भुजबळांची प्रतिष्ठा पणाला
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम