Satana | सटाणा येथे ‘एनजीपी ४५११’ संघटनेची आढावा बैठक

0
19
Satana
Satana

Satana |  बागलाण तालुका कर्मचारी संघटना यांच्या वतीने पंचायत समिती बागलाणच्या सभागृहात राज्याध्यक्ष बच्चु कडू व राज्य सरचिटणीस गिरीश दाभाडकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष बापू मोरे यांच्या अध्यक्षतेखाली एनजीपी ४५११ ची बागलाण तालुका आढावा बैठक पडली.

यापूर्वीच्या संघटनेमध्ये राहून संघटनेला खूप मरगळ आली होती व कर्मचाऱ्यांना न्याय दिला जात नव्हता. त्यामुळे पूर्वीच्या संघटनेचे नव्या संघटनेत विलीनीकरण करून नवीन संघटना उभी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कर्मचारी हा गावाचा मुख्य आधारबिंदू असल्याचे व संपूर्ण गावाचे कामकाज करणारा कर्मचारी म्हणून ओळखला जातो. परंतु त्याची स्वतंत्र अशी कुठलीच ओळख निर्माण होत नाही.

Deola | ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात देवळ्यात असहकार आंदोलन

Satana | आझाद मैदानावर आक्रोश मोर्चा

ग्रामपंचायत कर्मचारी हा प्रत्येक वेळी सांगेल ती कामे करण्यात अग्रेसर असतो. परंतु त्या बदल्यात त्याला कुठल्याही प्रकारचा ठोस मोबदला मिळत नाही. यासाठीच एनजीपी ४५११ ही संघटना बागलाण तालुक्यात सक्रिय करीत असल्याचे स्वप्निल अहिरे यांनी सांगितले. बैठकीत प्रामुख्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या जसे पगारवाढ, राहणीमान भत्ता, पीएफ व सेवा पुस्तके अद्यावत करणे याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच दि. २८ जून रोजी संघटनेच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर करण्यात येणाऱ्या भव्य अशा आक्रोश मोर्चाबाबत चर्चा करण्यात आली व आक्रोश मोर्चासाठी उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात आले.

Gram Panchayat Strike | ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प?; सरकारची डोकेदुखी वाढणार

यावेळी विभागीय अध्यक्ष दिलीप घोलप, अध्यक्ष बापू मोरे तसेच जिल्हा सचिव अमोल कातकाडे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीसाठी तालुक्यातून दीपक आहिरे, एकनाथ पवार, विनोद गरुड, हरी शेवाळे, वसंत नंदन, जिभाऊ देवरे, भाऊसाहेब खरे, बाळासाहेब सोनवणे, अमोल देवरे, सचिन निकम, मयूर वाघ, नरेश सोळंकी, सागर पवार, सुनिल जगताप, ज्ञानेश्वर जगताप, तसेच कळवण कर्मचारी दत्तात्रय दुसाने, कैलास राऊत, देवळा तालुका कर्मचारी शुभानंद देवरे, ईश्वर मोरे, महेंद्र बच्छाव, भूषण आहेर, निलेश साबळे, लखन गरुड, नानू आहेर आदींसह तालुक्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here