नाशिक स्मार्टसिटी कंपनी डोक्यावर पडली का ? पाईपलाईनसाठी स्मार्ट रस्ता फोडणार

0
3

नाशिक : नाशिक स्मार्ट सिटी कंपनी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. त्यांच्या या निर्णयावर अनेकांकडून टीकादेखील झाली आहे. मात्र, आता या निर्णयाने समस्त नाशिककरांमध्ये मोठा संताप होण्याची शक्यता होणार आहे.

स्मार्टसिटी कंपनीकडून साधारण पाच वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या १.१ किलोमीटरच्या स्मार्ट रस्त्यावर आता पाण्याची पाईपलाईन टाकली जाणार असल्यामुळे या रस्त्याची पुन्हा एकदा तोडफोड केली जाणार आहे. त्यामुळे हा स्मार्ट रस्ता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी याबद्दलची माहिती देताना सांगितले की, नाशिक गावठाण भागात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी सदर जलवाहिनी टाकणे गरजेचे असून त्यासाठी फक्त रस्त्याचा फुटपाथ खोदला जाणार आहे. तसेच या गावठाण पाणीपुरवठा योजनेसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद आहे. ज्यातून दीक्षित वाडा व गोल क्लब येथे दोन जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार आहे.

स्मार्टसिटीअंतर्गत २०१७ मध्ये हा रस्ता तयार करण्यात आला. तेव्हा अनेकांनी या रस्त्याची आवश्यकता नसताना व स्मार्ट पायलट रस्त्यासाठी अनेक महत्त्वाचे रस्ते शहरात असताना, नेमका हाच रस्ता स्मार्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने हा वादाचा विषय ठरला होता. मुख्य कारण हे की, हा वर्दळीचा रस्ता असून या भागात अनेक शासकीय कार्यालये, जिल्हा न्यायालय व शहरातील मुख्य बाजारपेठेकडे जाणारा मार्ग असल्याने, तसेच ग्रामीण भागातून जाणारे अनेक बसेस हे या मार्गांतून जात असल्याने इथले नागरिक, विद्यार्थी व असंख्य नाशिककरांचा ह्याला विरोध होता.

मुळात हा रस्ता सुस्थितीत असतानाही तो तोडण्याची गरज काय, असा प्रश्न नाशिककरांकडूनही विचारला गेला होता. नंतर ह्याच्या त्यात वाढलेली किंमत व कामात दिरंगाई यामुळे हा रस्ता गेली ३ वर्षे चर्चेत आला होता. नंतर रस्ता संपूर्णपणे तयार झाल्यावर रस्त्यांवरून प्रवास करताना रोलर कोस्टरचा अनुभव नागरिक घेत आहे. पण आता स्मार्टसिटी कडून पुन्हा एकदा रस्ता फोडला जाणार असल्याने समस्त नाशिककरांच्या रोषात वाढ होणार आहे. तसेच स्मार्ट रोड फोडण्याच्या निमित्ताने नाशिककरांची फसवणूक झाल्याचेही स्पष्ट होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here