दौंड-मनमाड दुहेरी रेल्वे मार्गासाठी जमीन खरेदी

0
2

द पॉईंट नाऊ: मनमाड ते पुणे या दुहेरी रेल्वे मार्गाच्या पुढील टप्प्यासाठी मनमाडमधील काही शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यासाठीची नोटीस महसूल विभागाने जाहीर केली आहे. त्यानुसार मौजे मनमाड येथील मिळकतीवर हरकती मागविण्यात आलेल्या असून संबंधितांना पुढील पंधरा दिवसात जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे पुरावे सादर करण्याची नोटीस देण्यात आलेली आहे.

मध्य रेल्वेच्या मनमाड ते पुणे या दुहेरी रेल्वे मार्गाच्या कामकाजासाठी मानमाडमधील काही जमिनी अधिग्रहित करण्यात येणार आहेत. ज्या जमिनींमधून हा प्रकल्प जाणार आहे त्या काही जमीन मालकांना नोटीस देण्यात आलेली आहे. गट क्रमांक २२४ पैकी ०.२४ हेक्टर आर, गट नंबर २२५ पैकी १.४९, गट नं. २२६ पैकी १.१४, गट नं. २२७/१ पैकी ०.३४, गट नं. २२७ पैकी ०.२७, २२७/३पैकी ०.०७, २२७/४ पैकी ०.२५, २२२/१ पैकी ०.२१ तर २२९/२ पैकी १.५१ हे.आर क्षेत्र संपादित करण्याची नोटीस बजवण्यात आलेली आहे.

मनमाड- दौंड या दुहेरी रेल्वेमार्गामुळे मनमाड ते पुणे हे अंतर सुमारे तीन तासांनी कमी होणार आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून यासाठी केंद्राने बजेटमध्ये देखील तरतूद केलेली आहे. या प्रकल्पासाठी मनमाडमधील ज्या क्षेत्रातून हा मार्ग जाणार आहे, तेथील काही शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यात येणार आहेत. या जमिनीची नोटीस महसूल विभागाने काढली असून या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे गहाण, दान, लीन, लिज, अन्नवस्त्र, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र,कोणत्याही स्वरूपाचा हक्क,
किंवा मळकतीचे प्रकरण साठेखत, करारमदार, इसार पावती, जनरल मुखत्यारपत्र अथवा अन्य अधिकार अगर हितसंबंध असल्यास न्यायप्रविष्ट, बँकेची जप्ती असल्यास संबंधितांनी १५ दिवसांच्या आत कागदोपत्री पुराव्यानिशी लेखी हरकती नोंदविण्याची संधी देण्यात आलेली आहे.

येवला उपविभागीय अधिकाऱ्यांकडे नोंदवा हरकत

■ ज्या गट क्रमांकाच्या मालकांच्या जमिनी खरेदी करण्यात येणार आहे, त्यांनी पुराव्यानिशी लेखी हरकती उपविभागीय अधिकारी येवला येथे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

■ मुदतीत कुणाचीही हरकत आली नाही तर या मिळकती बिनबोज्याच्या असल्याचे समजून खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here