Nashik | सरस्वती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

0
17
Nashik
Nashik

राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद |   इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील भरविर बु. येथील नामांकित असलेल्या सरस्वती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात
महापुरुषांना वंदन करून स्वागतंम सुस्वागतम हा मानाचा मुजरा या स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली प्रमुख मान्यवरांचा सर्वानुमते सत्कार समारंभ करण्यात आला त्यानंतर शाळेतील विविध स्पर्धेमध्ये गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.

Dhule Loksabha | जनतेच ठरल…!, मालेगावचे ‘भाईजी’ दिल्लीत पाठवणार.!

यात लहान मोठ्या गटात यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांना गोल्डन सिल्वर मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्य अधिकारी सौ ज्योती झनकर,संपत झनकर,यांच्यासह प्रमुख मान्यवर म्हणून समाजसेविका कविता पाळदे,गोरख मदगे,राधाकिसन झनकर,युवा उद्योजक दत्तू देवगिरे यांच्यासह बहुसंख्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांनी आमचे ‘पप्पानी गणपती आणला’ या गीताने गणरायाला वंदन करून कार्यक्रमाला दमदार सुरुवात केली. त्यानंतर शाळेतील सर्वच इयत्तेतील विद्यार्थ्यांनी विविध लोकप्रिय गाण्यांवर उत्तम नृत्य सादरीकरण करत कार्यक्रम यशस्वी केला याप्रसंगी शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचे पालकवर्ग परिसरातील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here