Deola | देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने खा. भगरे यांचा सत्कार

0
22
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | केंद्र सरकारने कांदा निर्यातीसाठी लावलेले २० टक्के निर्यात शुल्क माफ केल्याने तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, याकामी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील खासदार भास्कर भगरे यांनी पाठपुरावा करून लोकसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडल्याने भऊर येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. रविवारी दि.२३ रोजी खासदार भास्कर भगरे यांनी तालुक्यातील भऊर येथे जाऊन बाजार समितीचे माजी संचालक जगदीश पवार यांचे सांत्वन केले. केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन एक एप्रिलपासून निर्यातीला शुल्क माफ केले असून, त्यामुळे निर्यातीला चालना मिळेल व कांद्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील कसमादे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदा हे नगदी पीक आहे. कांदा बियाणे, मजुरी व खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात कांद्याला योग्य बाजार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणाच्या धरसोड वृत्तीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. कांद्याला परराज्यात चांगली मागणी असताना नोकर धार्जिनी केंद्र सरकारमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील मिळत नसल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत ग्रामीण भागातील आजी माजी मंत्री व खासदारांना निवडणुकीत पराभवाला समोर जावे लागले.

Deola | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी तालुक्यात गाव तेथे शाखा स्थापन करा – दिनकर पाटील

दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी डोक्यावर घेत लोकसभेत पाठवले. त्यांना शेतकऱ्यांची जाण असल्याने ते वारंवार केंद्रातील मंत्र्यांना भेटून कांदा व इतर शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी पाठपुरावा करीत आहेत. केंद्र सरकारने कांद्यारील निर्यात शुल्क माफ करावे, जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या खिशात दोन पैसे येतील, अशी मागणी लावून धरल्याने गेल्या दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने वीस टक्के कांदा निर्यात शुल्क माफ केले. यामुळे कांद्याचे बाजार भाव स्थिर राहण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यामुळे खासदार भगरे यांचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सत्कार केला. यावेळी प्रगतिशील कांदा उत्पादक शेतकरी सोनजी पवार, जगदीश पवार, रामदास पाटील, दिलीप आहेर, दिगंबर पवार, जितेंद्र पवार, विजय पवार, पंडित पवार, पोपट पवार, दीपक पवार, शशिकांत पवार, प्रकाश पवार, नंदू पवार, एस. टी पाटील आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here