Nashik Politics | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून मंगळवार दि. 22 ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या परंतु उमेदवारी न मिळालेल्या नेत्यांनी बंडखोरीचे अस्त्र हाती घेतले आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली आहे.
NCP Ajit Pawar | शिंदेसेने पाठोपाठ अजित पवार गटाची उमेदवार यादी जाहीर
समीर भुजबळांची अजित पवारांना सोडचिट्टी
नांदगाव विधानसभेसाठी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेच्या सुहास कांदे यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र या मतदारसंघातून उमेदवारीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ हे देखील इच्छुक होते. सुहास कांदेंना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे समीर भुजबळ नाराज झाल्याची चर्चा होती. त्यानंतर आज भुजबळ यांनी नांदगावातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीत बंडखोरी झाली असून भुजबळ यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला आहे.
पत्रकार परिषद केले स्पष्ट
पत्रकार परिषदेत बोलताना, समीर भुजबळ यांनी “महायुतीत धर्मात अडचण निर्माण होऊ नये, म्हणून मी राष्ट्रवादी पक्षाचा मुंबई प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.” असे जाहीर केले. तसेच “भयमुक्त नांदगाव तालुक्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असून तालुक्यातील विकासकामे करायची आहेत, येथील दहशतवाद मिटवायचा असून, नागरिक दहशतीखाली असल्याने बोलायला कोणी पुढे येत नाही, तेव्हा ही दहशत खोडून काढायची आहे.” असे सांगितले.
Nashik Political नाशिक पश्चिमचे राजकिय समीकरण बदलणार!; डॉ. अपूर्व हिरेंचा उद्धवसेनेत प्रवेश
भुजबळांच्या बंडखोरीने महायुतीला फटका
दरम्यान, नांदगाव विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे गणेश धात्रक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात कांदे-धात्रक-भुजबळ अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार असून समीर भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवाराला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम