Nashik Political | आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असून उमेदवारांची यादी जाहीर झाल्यामुळे अनेकांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. अशात निफाड विधानसभा मतदारसंघात कोणत्याच पक्षाने अद्याप इच्छुकांना एबी फॉर्म दिले नसले तरी निफाडमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिलीप बनकरांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Nashik Political | युतीसोबत आघाडीलाही बंडाचा फटका; नाशिक मध्यच्या जागेवरून आघाडीत बिघाडी!
आमदार दिलीप बनकरांचा एबी फॉर्म वेटिंग वर
अशात राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून ट्विस्ट वाढले असून भाजपचे यतीन कदम यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी मागील पंधरा दिवसांपासून फिल्डिंग लावल्याचे चित्र आहे. कदम यांच्या दावेदारीमुळे आमदार दिलीप बनकर यांचा एबी फॉर्म सध्या वेटिंग वर गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निफाड मतदारसंघावर दावा ठोकण्यात आल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम यांची कोंडी झाली होती. परंतु अनिल कदमांनी राजकीय चातुर्य वापरत ही जागा शिवसेनेला सोडवून घेण्यात यश मिळवले.
Nashik Political | दिनकर पाटलांचा भाजपला राम राम; राज ठाकरेंच्या इंजिनावर विधानसभा लढवणार
यतीन कदमांनी लावली राष्ट्रवादीकडे फिल्डिंग
चार वर्षांपूर्वी भाजपाचे कमळ हाती घेत यतीन कदमांनी निफाड विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला असून गेल्यावेळी अपक्ष उमेदवारी करून घेतलेली पंचवीस हजार मते आमदार बनकर व अनिल कदम यांच्या हार-जितीचे कारण ठरल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातून त्यांची राजकीय दावेदारी अधिकच मजबूत झाली. पण महायुतीत निफाडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे गेल्यामुळे कदम यांनी उमेदवारीसाठी आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवला असून माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, मंदाकिनी कदम यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेत कदमांनी उमेदवारीसाठी गळ घातली आहे. आमदार बनकर यांनी अनिल कदमांना “मीच टक्कर देऊ शकतो.” अशी बाजू यतीन कदमांनी बैठकीत मांडल्याची माहिती आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम