Nashik Political | विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आले असून नाशिक जिल्ह्यातील नांदगावात राजेंद्र पोपट देवरे खडकी यांनी घरवापसी करत दादा भुसे यांच्या उपस्थितीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे.
Nashik Political | ड्रग्स प्रकरणावरून फेक नारेटीव्ह; युतीच्या बैठकीत फरांदेंचे विरोधकांवर पलटवार
बंडू काका बच्छावांना धक्का
या पक्षप्रवेशामुळे बंडूकाका बच्छाव यांना मोठा धक्का बसला असून राजेंद्र देवरे यांनी आठ दिवसांपूर्वी दादा भुसेंवर टीका केली होती. त्यानंतर आज त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडल्यानंतर ऐन निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणे बदलली आहेत. राजेंद्र देवरे हे मालेगाव तालुक्यातील प्रखर व आक्रमक वक्ते म्हणून ओळखले जातात.
Nashik Political | युतीत पक्षांतर्गत वाद सुरूच; शिंदे गटाच्या नेत्याचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप
अन्याय झाल्यावर न्याय होणारच
यावेळी बोलताना त्यांनी, “2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात जी काही उलथापालत झाली, त्याच्याशी आपलं काही घेणेदेणे नाही. परंतु त्या उलतापालथीत मालेगाव तालुक्याला तारुन नेणारा नेता म्हणजे दादाजी भुसे. आज मी विचार केला. कुटुंबात एकाला कमी एकाला जास्त होत असतं. तसेच जिथे न्याय होतो तिथे थोडाफार अन्याय होणार व अन्याय झाल्यावर न्याय होणारच. याला विकास म्हणतात. अलबेल परिस्थिती जर टिकवून ठेवायची असेल व उपमुख्यमंत्री जर आपल्याला पाहायचा असेल तर एकत्र रहावं लागेल.” असे म्हटले आहे.
दादा भुसेंने नाराजांचे गाऱ्हाणे मंजूर करून घेतले
त्याचबरोबर, “आतापर्यंत महाराष्ट्रात काय झालं काय नाही, याबाबतीत विचार करण्यापेक्षा, कुणावर टीकाटिपणी करण्यापेक्षा आज एक नेतृत्व उभे राहिलेले आहे. की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनंतर कोणाचे नाव घेतले जात असेल, तर ते दादा भुसे यांचे आहे. तसेच मालेगावचा विकास पाहायचा असेल तर आपल्यासारख्यांना जे काही नाराज झाले असतील त्यांचे गाऱ्हाणे मंजूर करून घेणारे ते म्हणजे दादा भुसे आहेत.”असे म्हणत त्यांनी दादा भूसेंचे कौतुक करत आपला पाठिंबा दर्शवला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम