Nashik Political | विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आल्या असून विरोधक, सत्ताधारी आणि अपक्ष उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आता महायुती व महाआघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपल्या पक्षातील बंडखोरांना मनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न कितपत यशस्वी होतात हे आज दुपारी तीन वाजेनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र त्याआधीच जिल्ह्यातील 15 पैकी काही मतदारसंघातून उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती आता समोर आली आहे.
Nashik Politics | अखेर बंडोबांना मनवण्यात महायुतीला यश; नाशिक मध्य मधून दोन नेत्यांची माघार
‘या’ मतदारसंघातील उमेदवारांनी घेतली माघार
यामध्ये नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपचे दिलीप कुमार भामरे छावा क्रांतिवीर संघटनेचे करण गायकर, शशी जाधव, महेश हिरे यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर करण गायकर यांनी “मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशावरून आपले होम ग्राउंड असताना देखील नाशिक पश्चिम मधील अपक्ष उमेदवारी मागे घेतली आहे. परंतु नाशिक पूर्व मतदारसंघातून छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्य पक्षाचे उमेदवारी असल्यामुळे ती कायम ठेवण्यात आली आहे. असे स्पष्ट केले. या मतदारसंघात महायुतीच्या सीमा हिरे तर महाविकास आघाडीचे सुधाकर बडगुजर व मनसेचे दिनकर पाटील यांच्यात लढत होणार आहे.
Nashik Political | नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात युती, आघाडीला मनसेचे तगडे आव्हान
त्याचबरोबर, इगतपुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव देखील उपस्थित होते. तसेच अपक्ष उमेदवार संदीप जाधव व अनिता घारे यांनी देखील माघार घेतली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम