Nashik Political | बबनराव घोलप यांची कन्येला कायदेशीर नोटीस; आपल्या नावाचा वापर न करण्याचा दिला इशारा

0
43
#image_title

Nashik Political | नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी माझ्या नावाचा यापुढे कोणत्याही प्रकारे वापर करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. असा इशारा कन्या तनुजा घोलप यांना दिला आहे.

Nashik Political | राष्ट्रवादीकडून पुन्हा दिलीप बनकरांना संधी; भाजपाच्या यतीन कदमांचा हिरमोड

बबनराव घोलापांनआ कन्येला कायदेशीर इशारा

तनुजा घोलप या बबनराव घोलप यांच्या कन्या असून त्यांचे पतीकडील आडनाव भोईर असे आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तनुजा भोईर या तनुजा बबनराव घोलप असा उल्लेख करत होत्या. त्यामुळे यापुढे तनुजा यांनी आपल्या नावाचा वापर करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. असा इशारा बबनराव घोलप यांनी आता आपल्या वकीलामार्फत एका नोटीसद्वारे दिला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Nashik Political | नाशिक पूर्व मध्ये भाजपला फटका; भाजपला राम राम ठोकत गणेश गीते तुतारी फुंकणार!

तनुजा घोलप देवळाली मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला सोडचिट्टी ते शिवसेना उद्धव ठाकरे साहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून घोलप यांचे सुपुत्र योगेश घोलप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर तनुजा घोलप या भाजपच्या प्रमुख पदाधिकारी असून त्या सध्या देवळाली मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

“तनुजा ही आपली मुलगी जरी असली तरी तिने तिच्या नावापुढे पतीच्या नावाचा उल्लेख करावा. माझा आपल्या नावापुढे यापुढे कोणत्याही प्रकारे उल्लेख करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”

-बबनराव घोलप, माजी मंत्री


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here