Political News | राज्यामध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून राजकीय घडामोडींना वेग आले आहेत उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर नेत्यांची उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू झाली आहे त्या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून शक्तिप्रदर्शन, संवाद मेळावे व सभांचे आयोजन केले जात असून समीर भुजबळ यांनी नांदगाव येथील सभेमध्ये मराठा समाजाचे नेते शेखर पगार यांचे जोरदार भाषण सुरू होते. भाषणाअंति शिंदे गटाचे उमेदवार व विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी शेखर पगार यांना फोन करून शिवीगाळ केली आहे.
Political News | दादा भुसे यांच्या मालेगावच्या सभेत रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
नांदगावात राजकीय नाट्य
नांदगाव मतदार संघात राजकीय नाट्य रंगले असून आज समीर भुजबळ यांच्या सभेत मराठा समाजाचे नेते शेखर पगार यांनी भाषण केले असता, भाषण संपताच सुहास कांदे यांनी पगार यांना फोन करून शिविगाळ केली ही शिविगाळ पगार यांनी भर सभेत सगळ्यांना ऐकवली. तसेच सुहास कांदे यांनी आई-बहिणी वरून शेखर पगार यांना शिवीगाळ केल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम