Nashik | देवळ्यातील गिरणारे गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी; आरक्षण मुद्यावर मराठा समाज एकवटला! 

0
11

Nashik | राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सकल मराठा समाज आक्रमक झालेला आहे. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याकरता दिलेली मुदत संपली असुन राज्य सरकारने ठोस निर्णय न घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच्या मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. राज्यात पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्याचं आवाहन जरांगे यांनी केले असून नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांच्या प्रवेशद्वारावर पुढार्‍यांच्या प्रवेश बंदीचे फलक लागलेले आहेत.

Deola | दसऱ्याच्या दिवशीच एकुलत्या एक मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून उपोषण सुरू केले होते. एका महिन्यात सकारात्मक तोडगा काढू असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. निर्णय घेण्यासाठी सरकारला 40 दिवसांची म्हणजे 24 ऑक्टोंबर पर्यंतची मुदत देऊन जरांगे पाटील यांनी 14 सप्टेंबरला उपोषण सोडले. काल मंगळवार विजयादशमीच्या दिवशी ही मुदत संपत असून सरकारने अद्याप समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी तीव्र मात्र शांततेच्या मार्गाने सरकारला न जपणाऱ्या आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नाशिकातुन देखील बळ देण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांना जिल्ह्यातील गावागावात ‘प्रवेश बंदी’ करण्यात येते आहे.

Big News | दसरा मेळाव्याहून परतणाऱ्या शिंदे गटाच्या तीन बसचा भीषण अपघात; 25 जण जखमी

आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील गावांमध्ये येण्यास पुढाऱ्यांना बंदी करावी असे आवाहन जवान जरांगे पाटील यांनी केले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, नांदगाव, निफाड, नाशिक, इगतपुरी, सिन्नर या तालुक्यांतील अनेक गावांमध्ये पुढाऱ्यांना ‘प्रवेश बंदी’चे फलक लावण्यात आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवला, लासलगाव पाठोपाठ देवळा तालुक्यातही मराठा आरक्षणासंबधी धग पोहोचली असून गिरणारे या गावातदेखाील मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन करत राजकीय नेत्यांना गावात ‘प्रवेश बंदी’ असे फलक लावण्यात आले आहे. गिरणारे गावच्या मुख्य चौकात हा ‘प्रवेश बंदी’चा फलक गावाच्या दर्शनी भागात लावण्यात आला आहे. आरक्षणाच्या लढ्यात आमच्या सोबत रहा अन्यथा जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात कोणत्याही राजकीय नेत्यांनी प्रवेश करू नये, अशी भूमिका याठील स्थानिकांनी मांडली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here