Big News | दसरा मेळाव्याहून परतणाऱ्या शिंदे गटाच्या तीन बसचा भीषण अपघात; 25 जण जखमी

0
2

Big News | काल दसरा मेळावा आटोपून गावी परतणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या तीन बसचा भीषण अपघात झालेला आहे. दसरा मेळावा झाल्यानंतर आपापल्या गावी परतणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांचा मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूर जवळ भीषण असा अपघात झाला आहे. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारासची ही घटना घडली असून यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीही झाल्याचं पहायला मिळत आहे.

या भीषण अपघातात 25 जण जखमी

काल शिंदे आणि ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी या दोन्ही दसरा मेळाव्याला संपुर्ण राज्यातुन लोक आलेले होते. याच शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरून परतणाऱ्या शिंदे गटाच्या तीन बसचा शहापूरजवळ कळंभे गावाजवळ अपघात झाल्याची घटना घडलेली आहे. या अपघातात 25 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे. शिंदे गटाचे शिवसैनिक मुंबईहून (छ. संभाजीनगर) सिल्लोडला जात असताना हा भीषण अपघात घडला आहे. एका बसला ट्रकने मागून धडक दिली, त्याच वेळी धडक देणाऱ्या ट्रकला पाठी मागून येणाऱ्या दुसऱ्या बसने मागून धडक दिल्याने ती बस पलटी झाली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस शहापूर केंद्राचे कर्मचारी, शहापूर पोलीस मदतीला घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या या सर्व जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात नेमका कसा झाला?

एक ट्रक आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते प्रवास करत असलेल्या परिवहन महामंडळाच्या बसमध्ये हा भीषण अपघात झाला. त्यानंतर मागून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या इतर दोन बसेसही एकमेकांवर धडकल्या होत्या. यात ट्रक आणि एक बस थेट उड्डाणपुलावरील साईड डिव्हायडर तोडून उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कोसळली तर, इतर दोन बसचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. या रस्त्यावर काचांचा खच पडला आहे. या विचित्र अपघातात अनेकजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून काहींना गंभीर इजाही पोहोचलेली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे आणि वाहने हटवण्याचे काम केले जात आहे.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here