Dasara Melava Uddhav Thackeray| शिंदे गट तसेच उद्धव ठाकरे यांच्या गटाचा आज दसरा मेळावा पार पडला. दोन्ही ठिकाणी शिवसैनिकांची चांगलीच गर्दी बघायला मिळाली. दरम्यान, एकनाथ शिंदेंची तोफ ही आझाद मैदानावर तर ठाकरेंची तोफ ही पारंपरिक शिवतीर्थावर धडाडली आहे. दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी जवळपास एक तास भाषण केलं.दरम्यान यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवरून त्यांनी राज्य सारकारपासून तर थेट पंतप्रधान मोदीपर्यंत सर्वांचीच चांगलीच कानउघडणी केली आहे. दरम्यान, भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
मनोज जरांगेंचे मी आभार मानतो- उद्धव ठाकरे
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या आपल्या भाषणात बोलताना सर्वात आधी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं कौतुक केलं. अंतरवली सराटी येथे लाठीचार्ज झाल्यानंतर आपण तिथे गेलो होतो.या विषयी उद्धव ठाकरे यांनी जाहिरपणे भाष्य केलं व यावेळी त्यांनी सरकारवर जाहीर टीका केली. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मनोज जरांगे यांचे अभिनंदन केले. जातीजातीं मध्ये फूट पाडण्याचा भाजपचा डाव उधळून लावण्याचा चांगला प्रयत्न केल्याबद्दल जरांगे यांचे अभिनंदन ठाकरे यांनी केले. यावेळी ते पुढे म्हणे की, “जालियनवाला बागसारखं सरकारने अंतरवली सराटी येथे अमानुष लाठीचार्ज केला. मी तात्काळ तेथे गेलो. कुणाची डोके फोडली होती. तर कुणाला छर्रा मारलेल्या होत्या. असं बोलतानाच उद्धव ठाकरे यांनी त्यावेळचा एक भावनिक प्रसंग सांगितला.
CM Shinde | मराठ्यांना आरक्षण देणारच..; मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची भर सभेत घेतली शपथ
मुंबईला तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आमदार अपात्रतेचा निर्णय जेव्हा लावायचाय तेव्हा लावा, २० वर्षे किंवा ५० वर्षांनी लावा. मात्र, संपूर्ण जग हे बघत आहे. भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाला हे जुमानत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व राहणार आहे का? अंबेडकरांच्या संविधानाचं अस्तित्व राहणार आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. आता ३० तारखेला काय होतंय ते बघायचं आहे. प्रकरणाचा निकाल लागण्याआधी निवडणुका घेऊन दाखवा. जनता ठरवेल कोण पात्र आहेत आणि कोण अपात्र आहेत, तरी सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला अपेक्षा आहेत, असं म्हणत त्यांनी आमदार अपात्रता प्रकरणावर मिश्किक टिप्पणी केली.
ज्याप्रकारे रावणाने सीतेला पळवले होते. तसेच आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होत आहे. आणि पुन्हा काही भानगड नको म्हणून आपला धनुष्यबाणही चोरला आहे. पण ज्या प्रकारे हनुमानाने सोन्याच्या लंकेचे दहन केले होते. तशीच तुमची खोक्यांची लंका दहन करणार्या मशाली अजूनही माझ्यासोबत आहेत.
क्रिकेट सुरू आहे. काही जाहिराती पाहुन पाठ होतात. त्यातली एक जाहिरात आहे, तीन हिरो अजय देवगण, अक्षय कुमार, शाहरुख येऊन दोन दोन बोटं दाखववतात, आमच्याकडेही दोन दोन हाफ आहेत. टिव्हीवर जसे ते कलाकार दोन बोटं दाखवतात तसेच हे नेते दोन बोट दाखवतात. फरक एवढाच ते कमला पसंद वाले होते आणि हे कमळा पसंद वाले आहेत, अशी मिश्किल टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम