Dasara Melava | महाराष्ट्रात भ्रष्टाचार करणाऱ्यांना मांडीवर घेऊन पप्पी का घेताय? राऊतांची क्रेंद्र सरकारवर जहरी टीका…

0
13

Dasara Melava | अबकी बार ठाकरे सरकार दिल्लीत सुद्धा येणार असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. शिवसेनेचा एकच मेळावा असून दुसरा मेळाव्या कडे मी ढुंकूनही बघत नाही. तो चायनीज माल आहे असे टीकास्त्र राऊत यांनी यावेळी सोडले आहे. देशात भाजपचा पराभव होणार आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव होईल तसेच भाजपचे नेते इतर राज्यात जाऊन भ्रष्टाचाऱ्यांना उलट लटकवण्याची भाषा करताय अशी टीका देखील खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Dasara Melava | छाटू गद्दारांचे पंख….! अंबादास दानवे कडाडले 

इकडं शिवतीर्थावर मराठा तितुका मेळवावा…तिकडे सुरू आहे मराठा तितुका लोळवावा; संजय राऊत यांचा शिंदे गटावर हल्लाबोल

एकनाथ शिंदे स्वतः एक घोटाळा. शिवसेनेत होता तेव्हा घोटाळा होते आता भाजप सोबत जाऊन महाघोटाळा झाले आहेत. ही गर्दी सांगते ठाकरेंचं सरकार येणार असा विश्वास राउतांनी व्यक्त केला आहे. मागच्या मेळाव्याला मी तुरुंगात होतो. १०० दिवस तुरुंगात होतो. हा शिवसैनिक मोडला नाही..वाकला नाही..आम्ही पळणाऱ्यातले नाहीत. २०२४ मध्ये भाजपचा माज उतरवणार आहोत. तुम्हाला आम्ही घाबरत नाही. तुमच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही असं ठाम मत यावेळी संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. शिंदे गटातील सर्व नेत्यांवर खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधलेला आहे. यात सुरुवातीलाच अजित पवारांवरदेखील त्यांनी निशाणा साधला आहे.अजित पवार सिंचन घोटाळा करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतातआणि देशाचे गृहमंत्री अमित शाह म्हणतात ‘भ्रष्ट्राचार करनेवालो को उलटा लटकाऊंगा’. तसंच शिंदे गटातील दादा भुसे यांच्यावर३७८ कोटींचा घोटाळा आहे. तर उदय सामंत यांनी १०० कोटींचा डांबर घोटाळा केला. असे नेते सत्तेत आहेत. भाजप सरकार वाघनखांचा घोटाळा करतय.

Dashara melava: मी अंगार भंगार नाय र…;पालकमंत्री गोट्या खेळताय का ? सुषमा अंधारे कडाडल्या

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here