Skip to content

Dasara Melava| शिवतीर्थावर साक्षात बाळासाहेब अवतरतात तेव्हा..


Dasara Melava|  शिवतीर्थावर साक्षात बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थिती लावली. बाळासाहेब ठाकरेंसारखा चष्मा, गळ्यात रुद्राक्ष माळा, अगदी तशीच दाढी. बाळासाहेब यांच्यासारखे दिसणारे हे हुबेहूब व्यक्ती. बाळासाहेब यांचे ते निस्सीम भक्त आहेत. पुण्यात अनेकदा त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेटही घेतली होती. मागील वर्षीपासून शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होत आहेत. दरम्यान, आझाद मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तर शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांचा असे दोन मेळावे होत आहेत. दोन्ही गटाच्या मेळाव्याला येण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक एकवटत आहेत. या मेळाव्याला सुरवात होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. आझाद मैदान येथील मेळाव्यात व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची ठेवण्यात आली आहे. मात्र, शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात साक्षात बाळासाहेब ठाकरेंनी उपस्थिती लावली.

ठाण्यात सेंट्रल मैदान येथे २०१२ साली बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली होती. ही ठाणे येथील बाळासाहेब ठाकरे यांची अखेरची सभा ठरली होती. या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या खुर्चीवर बसून भाषण केलं होतं. याचवेळी बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या उद्धवला सांभाळा असे भावनिक आवाहन जनतेला केले होते. तिच खुर्ची आझाद मैदान येथी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात व्यासपीठावर ठेवली आहे. मागील वर्षीही  शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ही खुर्ची ठेवण्यात आली होती. बाळासाहेबांची आठवण म्हणून ही खुर्ची ठेवण्यात येते.

Dasara Melava | छाटू गद्दारांचे पंख….! अंबादास दानवे कडाडले 

एकीकडे शिवसैनिकांना भावनिक आवाहन करण्यासाठी शिंदे गटाने अशी तयारी केली आहे. तर, दुसरीकडे शिवतीर्थावर थेट बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थिती लावली. ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी कांतीभाई मिश्रा हे शिवतीर्थावर आले आहेत. “हा मेळावा निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा आहे. कोणतीही भावना घेऊन आलेलो नाही. मी दर वर्षी मेळाव्याला येत असतो. बाळासाहेबांनंतर आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत मी काम करतो आहे. आझाद मैदानातील मेळावा हा खरा शिवसेनेचा मेळावा नाही. शिवसेना एकच आहे आणि ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची. मी बाळासाहेब ठाकरेंसारखा दिसतो ही परमेश्वराची लीला. मला बघून अनेकांना मोठ्या साहेबांची आठवण येते. याबद्दल मी स्वतःला धन्य मानतो. चार इकडचे घेतले, चार तिकडचे घेतले म्हणजे शिवसेना होत नाही. असा खोचक टोला त्यांनी यावेळी शिंदे गटाला लगावला. निवडणूक येऊ द्या तेव्हा तुम्हाला शिवसेनेची खरी ताकद कळेल, असं इशारा त्यांनी यावेळी दिला.

‘छाताडावर बसणार पण आरक्षण नाही सोडणार’; मनोज जरांगेंचा निर्धार


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!