Election News | ग्रामपंचायत मधील लढतींचे आज चित्र होणार स्पष्ट; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची संधी

0
2
Igatpuri
Igatpuri

Election News | ग्रामपंचायत निवडणुकीतील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी बुधवारी म्हणजेच आज (दि. २५) शेवटची संधी आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणाचे आव्हान कायम राहणार आणि कोण माघार घेणार याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. गावपातळीवर कोणामध्ये लढत रंगणार असुन हेदेखील निश्चित होणार असून पुढील काही दिवस प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

Nashik | देवळ्यातील गिरणारे गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी; आरक्षण मुद्यावर मराठा समाज एकवटला! 

राज्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजला असून निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झालेली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तेथे सार्वत्रिक निवडणूक होणार असून 163 ग्रामपंचायतमधील रिक्त पदांकरितादेखील ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असुन त्यानंतर प्राप्त अर्जांची सोमवारी (दि. २३) छाननी प्रक्रिया राबविण्यात आली होती. आजच्या माघारीत किती उमेदवार अर्ज मागे घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून, त्यानंतरच सर्व लढतींचे चित्र स्पष्ट होईल.

Deola | दसऱ्याच्या दिवशीच एकुलत्या एक मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

  • 48  ग्रामपंचायतींमध्ये सदस्य आणि थेट सरपंचपदांसाठी 247 उमेदवारांचे अर्ज.
  • सरपंच आणि सदस्यांच्या 163 रिक्त पदांकरिता 106 इच्छुकांचे नामनिर्देशनपत्र आले आहे.
  • एकूण 353 अर्जांची छाननी प्रक्रिया सोमवारी पार पडली आहे.
  • सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठीचे सर्व अर्ज वैध ठरले.
  • उमेदवारी अर्ज माघारीसाठी आज (दि. २५) दुपारी तीनपर्यंत मुदत आहे.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here