Nashik |आमदार अपात्रता निकालाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचा ‘मोठा निर्णय’

0
21
Nashik
Nashik

Nashik | राज्यात सध्या अनेक मोठमोठ्या घडामोडी होत आहेत. आज राज्याच्या राजकारणातील ऐतिहासिक निर्णय जाहीर झाला. या पार्श्वभूमीवर शहरात काही चुकीच्या घटना घडू नयेत, म्हणून नाशिक पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नाशिक हे राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मात्र, सध्या ऐन थंडीत नाशिकचे वतावरण तापले आहे. दरम्यान, १२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी हे नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी येणार आहेत. त्यानंतर २२ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे हेदेखील नाशिकमध्ये येणार आहेत. (Nashik)

दरम्यान, या सर्व राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पोलिसांनी मनाईचे आदेश लागू केले आहेत. यानुसार नाशिक शहरात आजपासून २४ जानेवारीपर्यंत म्हणजेच तब्बल १५ दिवस मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. या १५ दिवसांच्या कालावधीत नाशिक पोलिसांच्या परवानगीविना कोणालाही कुठल्याही प्रकारचे सभा किंवा आंदोलन घेता येणार नाही. तसेच या नियमानुसार आता या काळात ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यासाठीही शहर पोलीस आयुक्तांची परवानगी लागणार आहे. (Nashik)

Nashik Loksabha | मराठ्यांना नडल्याचे परिणाम; अजित दादांनीच भुजबळांना दूर लोटले

तसेच, या १५ दिवसांच्या कालावधीत शहरात स्फोटक पदार्थ किंवा शस्त्र बाळगण्यास तसेच कोणाच्याही पुतळ्याचे दहन करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये होत असलेला पंतप्रधान  मोदींचा दौरा, जिल्ह्यातील काही शेतकरी संघटनांनी दिलेला आंदोलनाचा इशारा. यासोबतच मराठा, धनगर, व ओबीसी आरक्षणावरून राज्यभरात सुरू असलेली आंदोलनं या पार्श्वभूमीवर हा निर्णय नाशिक पोलिसांनी घेतलेला असल्याची माहिती समोर आली आहे.

Nashik |उद्धव ठाकरे नाशिक मध्ये 

२२ जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या राम मंदिराच्या लोकार्पण आणि प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यानं आमंत्रण देण्यात आलेले नाही. दरम्यान, त्या दिवशी ते नाशिक येथे काळाराम मंदिरात येणार आहेत. तसेच याठिकाणी ते गोदाआरती करणार असून, यानिमित्ताने ते नाशिकमधून आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचे नारळ फोडणार असल्याची माहिती आहे. मात्र, आता नाशिक पोलिसांनी लागू केलेल्या या आदेशामुळे आता येत्या काळात काय घडामोडी घडतात. हे पहावे लागणार आहे. (Nashik)

Nashik | पोलीस व पत्रकारांच्या कार्याचा समन्वय आवश्यक- उपायुक्त मोनिका राऊत

नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मोदींच्या नाशिक दौऱ्यामुळे आता नाशिकचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी नाशिककडे  लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. नाशिकमधून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार सोधात असलेला नवा चेहरा. त्यानंतर भाजप की शिंदे गट कोणाला मिळणार नाशिकची जागा?. धुळ्याची जागा दादा भूसेंच्या मुलाला आणि नाशिकची जागा भाजपला हे चर्चेत असलेलं समीकरण ?. या आणि अशा घडत असलेल्या अनेक घडामोडींमुळे सध्या नाशिक हे राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. (Nashik)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here