Nashik News | बोरगावात प्राथमिक रुग्णालयात रुग्णवाहिके अभावी रुग्णांची गैरसोय; नागरिकांकडून गांधी स्टाईलमध्ये आंदोलन

0
43
#image_title

Nashik News | मागील दोन महिन्यांपासून बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात 108 रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात करिता हाल होत असून प्रशासन याबाबत गांभीर्याने दखल घेत नसल्याने बोरगाव घाटमाथा परिसरातील नागरिक व आदिवासी आसरा फाउंडेशनच्या वतीने बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी “बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील 108 रुग्णवाहिका हरवली आहे” असा मजकूर असलेल्या बॅनरला पुष्पहार घालून गांधीगिरी स्टाईलमध्ये आंदोलन करण्यात आले.

Nashik News | नांदगाव मनमाड महामार्गावर भिषण अपघात

उपचारा अभावी रुग्णांचे मृत्यू

बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे राष्ट्रीय महामार्गावर महामार्गावरील गाव असल्याने रस्त्यावर वारंवार छोटे-मोठे अपघात होत असतात. त्यामुळे गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथे दाखल करावे लागते. परंतु 108 रुग्णवाहिका नसल्याने काही रुग्णांचा उपचारा अभावी मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाचे याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हे अनोख्या पद्धतीचे आंदोलन करण्यात आले होते.

Nashik News | नाशकात लाच घेणारा विभागीय तांत्रिक अधिकारी ताब्यात

रुग्णांची गैरसोय लक्षात घेत नागरिकांकडून अनोख आंदोलन

रुग्णांची होत असलेली गैरसोय याकडे गांभीर्याने लक्ष देत बोरगाव घाटमाथा परिसरातील नागरिक व आदिवासी आसरा फाउंडेशनचे अधिकारी सचिन राऊत, पंकज चव्हाण, किरण पवार, हेमंत चव्हाण, दीपक गांगुर्डे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत हे अनोखे आंदोलन केले.

“हे प्रशासन सुरगाणा तालुक्याला वाळीत टाकल्यासारखा प्रकार करत आहे. तेव्हा आम्ही कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न निर्माण होतो आहे. 108 रुग्णवाहिका नसल्याने तीन महिन्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यास जबाबदार कोण असेल हा प्रश्न पडला आहे.”

-सचिन राऊत, आदिवासी आसरा फाउंडेशन अध्यक्ष

“108 रुग्णवाहिका सेवा अत्यावश्यक असून नियमित रुग्णवाहिका नसणे ही गंभीर बाब असून याबाबत आमच्या स्तरावरून कायमस्वरूपी ॲम्बुलन्स द्यावी यासाठी वरिष्ठ अधिकारी यांना अहवाल सादर करण्यात आला आहे.”

-रामजी राठोड, तहसीलदार, सुरगाणा


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here